कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरात गांजा विक्रीत वाढ; कारवाईकडे दुर्लक्ष

कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरात राजरोसपणे गांजाची विक्री होत असून आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. त्यामुळे गांजा आणि गांजाडे (गांजाचे व्यसन करणारे) वाढले आहेत. यामध्ये युवकांची आणि अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. परिणामी नशा करून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. याकडे पोलिसांचा कानाडोळा होत आहे. दरम्यान, शहरात पानटपरी, भाजीपाला छपऱ्यातील पैशांच्या पेट्या फोडून चोरीच्या प्रकारात वाढ …

कोल्हापूर : कुरुंदवाड परिसरात गांजा विक्रीत वाढ; कारवाईकडे दुर्लक्ष

जमीर पठाण

कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरात राजरोसपणे गांजाची विक्री होत असून आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. त्यामुळे गांजा आणि गांजाडे (गांजाचे व्यसन करणारे) वाढले आहेत. यामध्ये युवकांची आणि अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. परिणामी नशा करून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. याकडे पोलिसांचा कानाडोळा होत आहे.
दरम्यान, शहरात पानटपरी, भाजीपाला छपऱ्यातील पैशांच्या पेट्या फोडून चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. बुधवारी रात्री भालचंद्र थिएटर चौकातील मोडू बागवान यांची पान-टपरी फोडून चोरी झाली आहे. हा प्रकार गांजा ओढणारे करत असल्याची चर्चा आहे.
कर्नाटक, इचलकरंजीतून गांजाचा पुरवठा करणारी टोळी सक्रीय
कुरुंदवाड व परिसरात गेल्या दीड वर्षापासून कर्नाटक राज्य, इचलकरंजी या भागातून गांजाचा पुरवठा करणारी मोठी टोळी कार्यरत झाली आहे. गांजा पुरवठा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. शहरात गांजाची पाळे-मुळे खोलवर गेली आहेत. कुरुंवाडात किलोने मिळणाऱ्या गांजाची एकेक ग्रॅमने विक्री केली जात आहे. तंबाखूमधून गांजा ओढल्यानंतर दिवसभर नशा राहत आहे. तसेच सहजपणे गांजा मिळत असल्याने अनेक जण नशेसाठी गांजा ओढतात. एक ग्रॅमची पुडी सुमारे १०० रुपयाला मिळत असल्याची चर्चा आहे. युवा पिढी या गांजाच्या व्यसनात पुरती बुडाली आहे.
महिला शेत मजुरांच्यात भीतीचे वातावरण
शहरातील लिलाव होणाऱ्या भाजीपाला मार्केट मधील भाजीपाल्याच्या ओट्याखाली, तबक उद्यान गॅलरीत, स्मशानभूमी, नदीकाठी, माळ-भाग येथील बगिजा, बस्तवाड रस्त्यावरील जॅकवेलच्या खाली अनेक जण गांजा ओढत बसलेले असतात. त्यामुळे या परिसरातील शेतात काम करणाऱ्या महिला शेत मजुरांच्यात भीतीचे वातावरण आहे. नशा केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे. नशेसाठी कोणताही गुन्हा करण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत, हे आजपर्यंत चोरी, मारामारी, भुरट्या चोऱ्यांच्या प्रकारातून उघड झाले आहे.
कुरुंदवाड व परिसरातील  शाळकरी मुले गांजा ओढण्याच्या व्यसनात गुरफटली आहेत. गांजा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करून जेलची हवा खायला लावल्यास याला आळा बसू शकतो. दिखावा न करता कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, कुरुंदवाड पोलिस याबाबत गंभीर होणार का? असा प्रश्न आहे.
गांजा विक्रेत्यांना झिरो पोलिसाचे पाठबळ
कुरुंदवाड शहर व परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या फाळकुटांकडून झिरो पोलिसाला मानधन मिळते. हा झिरो पोलीस पोलीस ठाण्यात बसून कोण पोलीस व कर्मचारी बाहेर जात आहेत. याची माहिती त्या गांजा विक्रेत्याला पुरवतात आणि तो आपला गांजा विक्री करून पसार होतो. प्रशासनाने सर्वात पहिल्यांदा या झिरो पोलिसाच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : खा. शाहू महाराज यांची दै.‘Bharat Live News Media’स भेट
कोल्हापूर : कुरुंदवाड-भैरववाडी येथील दारू अड्डा म्हणजे गुन्हेगारी निर्मितीचे 
कोल्हापूर : मयुर फाटा येथे ट्रेलरची दुचाकीला धडक; तरूणाचा मृत्यू