मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ प्रकरण; आता रवीनाने सोडले मौन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नकतेच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी रवीनाचा मुंबईतील वांद्रे परिसरात तीन महिलांना शिवीगाळ आणि मारहाण केलेल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ही घटना पोलिस स्टेशनपर्यत पोहोचली होती. मात्र, कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणानंतर आता रवीना टंडनने चाहत्याचे आभार मानत पहिल्यांदा मौन सोडले आहे. या …

मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ प्रकरण; आता रवीनाने सोडले मौन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नकतेच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी रवीनाचा मुंबईतील वांद्रे परिसरात तीन महिलांना शिवीगाळ आणि मारहाण केलेल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ही घटना पोलिस स्टेशनपर्यत पोहोचली होती. मात्र, कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणानंतर आता रवीना टंडनने चाहत्याचे आभार मानत पहिल्यांदा मौन सोडले आहे.
या प्रकरणाबाबत रवीना काय म्हणाली…
अभिनेत्री रंनीना नुकतेच तिच्या इन्टाग्रामवर झालेल्या प्रकरणानंतर पहिल्यांदा मौन सोडत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने सपोर्ट केलेल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. ”या प्रकरणात भावनिक प्रेम, विश्वास आणि समर्थनासाठी धन्यवाद! कथेचा सारांश? आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही बाहेर काढा!” असेही तिने म्हटलं आहे. या घटनेदरम्यान सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांनी तर्क-वितर्क लावले होते. काहींनी रवीनाच्या वागण्याची खिल्ली उडवली, तर काही नेटकऱ्यांनी तिला सपोर्ट केला आहे.

काय आहे प्रकरण?
अभिनेत्री रवीना टंडनच्या कार ड्राइव्हरने शनिवारी (दि, १ जून) च्या रात्री उशिराने मुंबईतील रिझवी कॉलेजजवळील कार्टर रोडवर तीन महिलांना जोराचा धक्का दिला. या घनेनंतर त्या महिलांनी आणि तेथील नागरिकांनी गर्दी केली. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत कारमधून उतरली आणि त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे सांगितले होते. मात्र, वास्तवात तसे काहीही नव्हते.

तर महिलांनीच रवीना जाब विचारल्याचा हा व्हिडिओ होता. चुकीने ड्राइव्हरने कार पार्किंग करत असताना त्यांना धक्का लागला असल्याचेही बोलले जात होते. नंतर हे प्रकरण पोलिसापर्यत गेलं, मात्र, नंतर यावर पडदा पडला. रवीना सुरूवातीला तिच्या घरी जाते आणि नंतर पतीसोबत पोलिस स्टेशनमध्ये येवून सर्व हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला नाही. हे प्रकरण येतेच मिटवण्यात आलं आहे.
हेही वाचा

कंगनाच्या फ्लॉप चित्रपटातील हिरो राजकारणात मात्र सुपरहिट, अभिनेत्रीला दिले आलिंगन (Video)
Raveena Tandon : ढकलू नका; भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत रवीनाची महिलांना शिवीगाळ करत मारहाण
Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video)