रशियात जळगावची चार मुले बुडताना लाईव्ह होतं सुरु, कुटुंबीयांचे हृदय पिळवटले
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रशियाच्या वोल्खोव नदीत चार भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्य़ांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी एरोस्लाव-द-वाआज नोवगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीत शिकत होते. मृतांमध्ये एकाची ओळख जिशान अशपाक पिंजरी अशी झाली आहे. या घटनेच्या वेळी व्हिडिओ कॉलवर तो घरच्या मंडळींसोबत बोलत होता, अशी माहिती जिशानच्या कुटुंबीयांनी दिलीय.
अधिक वाचा –
रशियात नदीत बुडून ४ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश
हर्षल अनंतराव देसले, जिया फिरोज पिंजारी आणि मलिक गुलामगौस मोहम्मद याकूब अशी अन्य तीन विद्याथार्यंची ओखळ पटली आहे. हे सर्वजण नदी जवळ फिरत होते. एक भारतीय विद्यार्थीनी वोल्खोव नदीत पोहताना किनाऱ्यापासून थोडी दूर गेल्यानंतर बुडू लागली. तेव्हा तिचे इतर चार मित्र तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तीला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन विद्यार्थी बुडाले. दरम्यान एका मुलीला स्थानिकांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले. निशा भुपेश सोनावणे असे वाचलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक वाचा –
कंगनाच्या फ्लॉप चित्रपटातील हिरो राजकारणात मात्र सुपरहिट, अभिनेत्रीला दिले आलिंगन (Video)
मृतदेह आणणार भारतात
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांनी म्हटलंय की, “एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. तीन अन्य विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे. आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने रशियातील भारतीय दूतावास आणि पीटर्सबर्गमधील महावाणिज्य दूतावासच्या संपर्कात आहोत. आम्ही मृतदेहांना आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहे.”
अधिक वाचा –
कंगना रनौत यांना थप्पड लगावल्यानंतर काय म्हणाला CISF गार्डचा भाऊ?