पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा आगामी ‘अॅनिमल’ चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजे, १ डिसेंबर २०२३ ला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ( Animal Advance Booking ) मोठा धमाका केला आहे. ॲनिमल चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २० कोटींची भरघोष अशी कामगिरी केली आहे. यामुळे बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ आणि साऊथ स्टार रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपटाला मागे टाकले आहे.
संबंधित बातम्या
Randeep Hooda Marriage : रणदीप हुड्डा- लिन लैशराम मणिपुरी पद्धतीने विवाहबद्ध (video)
Animal movie : रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
Animal In Telugu : संदीप रेडी वांगा यांचा मोठा निर्णय, ‘ॲनिमल’चा तेलुगुत रिमेक बनवणार
मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. हा चित्रपट उद्या शुक्रवारी सिनेमा गृहात दस्तक देणार आहे. रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच चित्रपटाने तब्बल २० कोटींची भरघोष अशी कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगदरम्यान ६ हजार स्क्रीन्सवरून आता १० हजार स्क्रीन्सवर चित्रपट पोहोचला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटाचा पहिला शो शुक्रवारी (दि. १ डिसेंबर) रोजी सकाळी ७ वाजता मुंबई आणि दिल्लीत सुरू होणार आहेत. आज गुरुवारी सकाळपर्यंत चित्रपटाची ७ लाख ४५ हजारांहून अधिक तिकिटांची ॲडव्हास बुकिंग झाली आहे.
रिलीजच्या आदल्या दिवसाच्या भरघोष कमाईवरून बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ आणि साऊथ स्टार रजनीकांतचा ‘जेलर’ चित्रपटाला मागे टाकण्यात यश आलं आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, १ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाने ॲडव्हास बुकिंगमध्ये केवळ १ कोटी ८० लाखांची कमाई केली आहे आणि फक्त ५८ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. तर रजनीकांतच्या ‘जेलर’ ने १८.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. एकिकडे या आकडेवारीवरून ‘सॅम बहादूर’ आणि ‘जेलर’ चित्रपट ॲडव्हास बुकिंगमध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे. तर रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची चाहत्यांच्यात क्रेझ पाहायला मिळत आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा आणि तृप्ती दिमरी यांसारखे कलाकार आहेत. रणबीर कपूरची फॅन फॉलोइंग खूपच आहे. दरम्यान चित्रपट रिलीज झाल्यानंतर भऱघोष अशी कामगिरी करेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. ( Animal Advance Booking )
The post ‘ॲनिमल’ चं जबरदस्त बुकिंग; ‘सॅम बहादुर’, ‘जेलर’ ला टाकलं मागे appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा आगामी ‘अॅनिमल’ चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजे, १ डिसेंबर २०२३ ला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ( Animal Advance Booking ) मोठा धमाका केला आहे. ॲनिमल चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २० कोटींची भरघोष अशी कामगिरी …
The post ‘ॲनिमल’ चं जबरदस्त बुकिंग; ‘सॅम बहादुर’, ‘जेलर’ ला टाकलं मागे appeared first on पुढारी.