करिअर खाद्यपदार्थ विज्ञान- तंत्रज्ञान; जाणून घ्या याविषयी
आपल्या सगळ्या जीवन प्रक्रियांची मूलभूत गरज म्हणजे, अन्न. म्हणूनच खाद्यपदार्थ शास्त्र आणि तंत्र हे केवळ आपल्या कुटुंबाला जबाबदारीने पोषक व समतोल आहार देणाऱ्या गृहिणीसाठीच नव्हे, तर हॉटेल्स, हॉस्पिटल, कॅन्टीन इत्यादी अन्नपुरवठा करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठीही महत्त्वाचं आहे. खाद्यपदार्थ तंत्रज्ञाचं काम प्रामुख्याने तांत्रिक व शास्त्रशुद्ध असतं. हॉटेल्स, हॉस्पिटल्स, अन्नपुरवठा करणाऱ्या संस्था, खाद्यपदार्थ उद्योग इत्यादी ठिकाणी हे तज्ज्ञ काम करतात. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणं, त्याची चव बघणं, ताज्या आणि टिकाऊ अन्नपदार्थांच्या भेसळीसंदर्भात तपासणी करणं या मूलभूत कामांसोबतच अन्नपदार्थ कोणत्या तापमानाला थंड करावा इत्यादी तांत्रिक गोष्टींबद्दलही सल्ला देतात.
फूड इंडस्ट्री ज्या पद्धतीने आकार घेत चालली आहे ते पाहता त्यानुसार खाद्यपदार्थ विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक छोटे-मोठे अभ्यासक्रम आता उपलब्ध झाले आहेत. छोट्या कालावधीचे सर्टिफिकेट व डिप्लोमा अभ्यासक्रम या अंतर्गत उपलब्ध आहेत. अन्नपुरवठा करणाऱ्या लहान संस्था, खाद्यपदार्थ प्रक्रिया करणाऱ्या संस्था इत्यादींमध्ये नोकरी मिळवण्यासाठी असे अभ्यासक्रम उपयुक्त असतात. खाद्यपदार्थांच्या संदर्भातलं संशोधन व प्रशिक्षण करणं, तसंच स्वतःचा व्यवसाय सुरू करणं यासाठी पदवी आणि संशोधनातील गुणवत्ता उपयुक्त ठरते.
खाद्यपदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्यामुळे संशोधनाच्या क्षेत्रात खाद्यपदार्थ तंत्रज्ञांनाला खासगी व सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांत अलीकडच्या काळात मागणी वाढत आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत अन्नपदार्थांच्या रुचकर क्षेत्राची आवड जोपासायची असेल, तर खाद्यपदार्थ विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विद्याशाखेचा विचार हटके ठरेल.
-करिअर कट्टा
हेही वाचा
करिअरची दिशा ठरवणार्या ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन
Career : करिअर निश्चित करताना ‘या’ सहा गोष्टींचा विचार कराच
‘हर्बल कॉस्मॅटिक्स’मधील करिअर, जाणून घ्या याविषयी