Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत २०२४ मध्ये हिमाचलमधील मंडीतून नवनिर्वाचित भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत यांना थप्पड मारण्याचे वृत्त समोर आले आहे. कंगना रनौतसोबत ही घटना चंदिगडच्या विमानतळार झाली, जेव्ही ती सिक्युरिटी चेक इन नंतर बोर्डिंगसाठी जात होती. दरम्यान, एलसीटी कुलविंदर कौर (CISF युनिट चंदिगड एअरपोर्ट) ने कंगना यांना थप्पड लगावली होती. यानंतर त्या CISF गार्डला ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर कंगना रनौतने एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024
अधिक वाचा –
कंगना रनौत यांना थप्पड लगावल्यानंतर काय म्हणाला CISF गार्डचा भाऊ?
कंगना रनौत यांनी व्हिडिओ केला जारी
कंगना रनौत यांनी व्हिडिओ जारी करून सांगितली की, विमानतळावर तिच्यासोबत काय काय घडलं. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, “मला खूप सारे फोन कॉल्स येत आहेत, मी आपणास सांगू इच्छिते की, सध्या मी सुरक्षित आहे. आज चंदिगड विमानतळावर माझ्यासोबत एक घटना घडली. विमानतळावर एका महिला जवानने मला शिव्या देणं सुरु केलं. तिने मला सांगितलं की, ती शेतकरी आंदोलनाची समर्थक आहे. तिने बाजूने येऊन माझ्या चेहऱ्यावर थप्पड मारली. मी तर सुरक्षित आहे, पण, माझी चिंता पंजाबमध्ये वाढत असलेला अतिरेक आणि दहशतवाद याविषयी आहे. याला कसंही करून नियंत्रित करावं लागेल.”
अधिक वाचा –
अनिल कपूर करणार बिग बॉस ओटीटी सीझन ३ होस्ट!
चंदिगड विमानतळावरील घटना
ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजताची आहे. कंगना एयरपोर्ट सिक्युरिटी चेककरून निघत होत्या. तेव्हा एका महिला जवानसोबत त्यांचा वाद झाला. कंगना यांनी या प्रकरणी तक्रार करून महिला जवानला नोकरीवरून हटवण्याची आणि तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अधिक वाचा –
‘इश्क विश्क रिबाउंड’चं नवीन गाणं ‘छोट दिल पे लगी’ रिलीज
BIG BREAKING 🚨🚨🚨
Kangana Ranaut slapped !!?
A CISF constable lady Kulwinder Kaur slapped the new MP for calling the Farmers Khalistanis, as the rumour goes.
About time Kangana realises, opening her wide mouth without thinking comes with a cost. pic.twitter.com/Me8WVtT9rf
— Azy (@Azycontroll_) June 6, 2024