ब्रेकिग | नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा संसदीय पक्ष, NDA नेतेपदी

ब्रेकिग | नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा संसदीय पक्ष, NDA नेतेपदी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भाजपा नेते नरेंद्र मोदींची संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली. यावेळी नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच विकास झाल्याचे नड्डा म्हणाले. सत्तास्थापणेपूर्वी एनडीए पक्षाची बैठक जुनी संसद भवनच्या संसदेच्या सेट्रल हॉलमध्ये आज (दि.७ जून) सुरू आहे.
आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आपण श्री नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा NDA चे नेते म्हणून निवड करणार आहोत. आज आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्षदर्शी आहोत. हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे, असेही जे.पी नड्डा म्हणाले.
राजनाथ सिंह यांच्याकडून NDA नेते पदाचा प्रस्ताव
मंत्रिमंडळातील त्यांचे (श्री नरेंद्र मोदीजी) सहकारी या नात्याने केवळ मीच नाही तर सर्व देशवासीयांनी मोदीजींची कार्यक्षमता, कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि सत्यता प्रत्यक्ष पाहिली आहे. पुढील ५ वर्षे नरेंद्र मोदी यांनी नेतृत्त्व कारावं ही देशातील जनतेची इच्छा आहे.  असे म्हणत राजनाथ सिंह यांनी संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला अमित शहा आणि नितीन गडकरी या दोघांनीही अनुमोदन दिले आहे.

Go to Source