अल्पवयीन मुलांकडून दुकाने फोडून चोरी, १२ लाखांची चांदी जप्त
जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा– शहरातील फुले मार्केटमध्ये दि. 4 रोजी मध्यरात्री 3 दुकानांमध्ये चोरी झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, मालेगाव येथील सराफ व्यावसायिकाच्या दुकानातून रोकडसह 12 लाख रुपयांची चांदीचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
शहर पोलीस ठाण्यासमोरील फुले मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात कपड्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून कपड्यांसह रोकड लाबविली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, ही चोरी शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने केल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तेजस मराठे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना याविषयी माहिती दिल्यानंतर तीन दुकाने फोडून चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तांबापुरा परिसरात राहणाऱ्या साथीदारासह अन्य दोन जणांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तांबापुरा परिसरातून दुसऱ्या अल्पवयीन चोरट्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीनंतर दोघांची कबुली
दोघ अल्पवयीन चोरट्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी मालेगावातील किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफाच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. याठिकाणाहून चौघांनी बारा लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरुन नेला होता. त्या अल्पवयीन चोरट्यांनी त्यातील साडेसहा किलो चांदीचे दागिने काढून दिले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनिल पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश पाटील, सुधीर साळवे, अमोल ठाकूर, मनोज पाटील, रतन गिते यांच्या पथकाने केली.
हेही वाचा –
Nashik Water Shortage | राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना नाशिकमधील टंचाईचे संकट गडद
‘हे’ 100 फुटी ‘चालणारे झाड’ आहे जंगलाची शेवटची खूण