बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी

बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी

पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमध्ये ४८ तासांहून अधिक वेळ बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. (Uttarakhand Tunnel Crash News)
संबंधित बातम्या 

Uttarakhand Tunnel Crash | बोगद्यातील ४० मजुरांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर, पाईपमधून अन्नाची पाकिटे, ऑक्सिजनचा पुरवठा
Tunnel Collapse in Uttarkashi: आम्ही सुरक्षित आहोत : बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी दिला प्रतिसाद
Uttarkashi Tunnel Collapse : जगण्याची लढाई युद्धपातळीवर : बोगद्यात अडकलेले सर्व ४० मजूर सुरक्षित

बचाव पथकाने २०० मीटर परिसरात कोसळलेला ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले आहे. बचाव पथक बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे अंतर सुमारे ४० मीटरचे आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडथळा आणणारा सुमारे २१ मीटरचा स्लॅब हटवण्यात आला आहे. १९ मीटर रस्ता मोकळा करणे बाकी आहे. बचाव पथकाला सुरुवातीला ३० मीटरचा ढिगारा हटवणे शक्य होते, परंतु काही मातीचा ढिगारा पुन्हा कोसळला आहे. त्यामुळे बचाव पथक केवळ २१ मीटरचे अंतर पार करू शकले.
मिळालेल्या माहितीनुसार, ९०० मिमी व्यासाचे धातूचे पाइप सोमवारी रात्री उशिरा सिल्क्यारा बोगद्याच्या ठिकाणी आणण्यात आले. बचाव पथकाने ढिगाऱ्यातील पाईप्स दुरुस्त करण्यासाठी ड्रिलिंग प्रक्रिया सुरू केली, जेणेकरून अडकलेल्या कामगारांना धातूच्या पाईप्सद्वारे बाहेर काढता येईल. बचाव पथक ढिगाऱ्यामध्ये ड्रिल करण्यासाठी ऑगर मशीनचा वापर करत आहे.
दरम्यान, उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तराखंड सरकारने सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापन केली आहे. (Uttarakhand Tunnel Crash News)
४.५ किमी लांबीचा बोगदा उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्रीच्या सिल्क्यारा आणि पोलगाव गावांदरम्यान बांधला जात आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तरकाशी आणि यमुनोत्री दरम्यानचे प्रवासाचे अंतर २६ किमीने कमी होणे अपेक्षित आहे.

#WATCH | SDRF rescue teams led by Commandant SDRF Manikant Mishra carry out the operation to rescue 40 labourers trapped inside the Silkyara Tunnel in Uttarkashi pic.twitter.com/aN72jZGrEm
— ANI (@ANI) November 14, 2023

The post बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : उत्तराखंडमध्ये ४८ तासांहून अधिक वेळ बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी पहाटे पाचच्या सुमारास एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सातत्याने बचावकार्य सुरू आहे. (Uttarakhand Tunnel Crash News) संबंधित बातम्या  Uttarakhand Tunnel Crash | बोगद्यातील ४० मजुरांसाठी बचावकार्य …

The post बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी appeared first on पुढारी.

Go to Source