सोनू सूदने एन. चंद्राबाबू नायडू यांचे केले अभिनंदन, नायडूंनी मानले आभार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनू सूदने एन. चंद्राबाबू नायडूंच्या निवडणुकीतील यशाचा आनंद साजरा केला आणि खास शुभेच्छा दिल्या. सोनू सूदची राजकारणातील आवड अज्ञात नाही. राजकारणात येण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असतानाच ते अनेकदा राजकीय विचार मांडताना दिसतात. अलीकडेच अभिनेत्याने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर ज्येष्ठ नेते एन. चंद्राबाबू नायडू यांचे राज्य निवडणुकीत विजयाबद्दल …

सोनू सूदने एन. चंद्राबाबू नायडू यांचे केले अभिनंदन, नायडूंनी मानले आभार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोनू सूदने एन. चंद्राबाबू नायडूंच्या निवडणुकीतील यशाचा आनंद साजरा केला आणि खास शुभेच्छा दिल्या. सोनू सूदची राजकारणातील आवड अज्ञात नाही. राजकारणात येण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असतानाच ते अनेकदा राजकीय विचार मांडताना दिसतात. अलीकडेच अभिनेत्याने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर ज्येष्ठ नेते एन. चंद्राबाबू नायडू यांचे राज्य निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले.
सोनू सूदने लिहिले, “अभिनंदन सर @ncbn ❤❤❤❤❤ विशेष म्हणजे सोनू सूद आणि नायडू यांचे नाते खूप मोठे आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि आंध्र प्रदेशातील एका गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर दिल्याबद्दल या नेत्याने सूद यांना वैयक्तिकरित्या फोन केला होता. सूदने लिहिलं, “अभिनंदन सर” यावर नायडू यांनी उत्तर दिल. “थैंक यू व्हेरी मच sonusood गारू.”
सोनू सूद ‘फतेह’ या चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस देखील मुख्य भूमिकेत आहे.
चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांची एन्ट्री
अलीकडेच सोनू सूद यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह हे फतेहमध्ये असल्याचे वृत्त दिले. सायबर क्राईमभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात नसीरुद्दीन शाह एका हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहेत. सूद यांच्या शक्तीसागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित ‘फतेह’ या वर्षी रिलीज होणार आहे.

Thank you very much @sonusood Garu. https://t.co/mNLQqis8wn
— N Chandrababu Naidu (@ncbn) June 4, 2024