पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून (दि.३०) युएईमधील दुबई शहरात COP 28 शिखर परिषद सुरू होत आहे. या २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. ते उद्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यांसर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्याबद्दल माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना सांगितले.
याविषयी माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दोन दिवसीय दुबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन अंतर्गत आयोजित यूएन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स (UNCC) मधील पक्षांच्या २८ व्या परिषदेला (COP28) उपस्थित राहणार आहेत. तसेच ते इतरही तीन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत ज्यापैकी दोन कार्यक्रम भारताकडून सहआयोजित करण्यात आले आहेत. भारत आणि यूएई ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह लाँच करत आहे, असेही परराष्ट्र सचिवांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. (Cop28 dubai)
#WATCH | Delhi | Foreign Secretary Vinay Kwatra says, “Prime Minister will have a set of bilateral meetings with many of his counterparts (on the sidelines of COP28 World Climate Action Summit in the UAE)…” pic.twitter.com/fTB4PGhsH6
— ANI (@ANI) November 30, 2023
Cop28 dubai : जागतिक हवामान बदलासंदर्भातील ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
संयुक्त राष्ट्राच्या कॉप परिषदेत हवामान संदर्भातील अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संवादामध्ये हवामान बदलाचे दुष्परिणाम, जीवाश्म इंधनाचा वापर, मिथेन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक मदत आणि देण्यात येणारी भरपाई या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. (Cop28 dubai)
जगभरातील २०० देशांचे नेते होणार सहभागी
जीवघेणी उष्णता, दुष्काळ, जंगलातील आग, वादळ आणि पूर यांचा जगभरातील जीवनमान आणि जीवनावर परिणाम होत आहे. या मुद्यांवर संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यातील ९० टक्के जीवाश्म इंधनामुळे झाले होते. कॉप-२८ (COP-28) दरम्यान याविषयावरही चर्चा होणार आहे. जगभरातील राजा चार्ल्स तिसरा, पोप फ्रान्सिस आणि जवळपास 200 देशांचे नेते या मुद्द्यांवर ठळकपणे लक्ष देणार आहेत. १ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारताकडून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. (Cop28 dubai)
#WATCH | Dubai, UAE: Visuals from Dubai Exhibition Centre where the COP 28 Summit is taking place
Prime Minister Narendra Modi will be on a two-day visit to Dubai from November 30 to December 1, to attend the 28th Conference of the Parties (COP28) at the UN Climate Change… pic.twitter.com/cGktFwgYh5
— ANI (@ANI) November 30, 2023
हेही वाचा:
World COPD Day : धूर, धुळीचा फुफ्फुसावर जीवघेणा परिणाम
Climate Change : हवामान बदलामुळे येत्या शतकात १ अब्ज लोकांच्या अकाली मृत्यूची शक्यता! अभ्यासकांचा दावा…
PM Modi on Climate Change : जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर भारताकडे रोडमॅप : पंतप्रधान नरेंद्र मोदी
The post पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून (दि.३०) युएईमधील दुबई शहरात COP 28 शिखर परिषद सुरू होत आहे. या २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. ते उद्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यांसर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्याबद्दल माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी …
The post पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार appeared first on पुढारी.