
पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाम सरकारच्या ‘अमृत वृक्ष आंदोलन’च्या (Amrit Brikshya Andolan) माध्यमातून १७ सप्टेंबर २०२३ रोजी संपूर्ण राज्यात तब्बल एक कोटी रोपांची लागण करण्यात आली होती. या उपक्रमाने तब्बल ९ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत.बुधवारी (दि.२९) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे आयोजित कार्यक्रमात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून प्रमाणपत्रे स्वीकारली. दरम्यान, याबाबत सरमा यांनी ट्विट केले, “आज मिळालेले 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स अमृत वृक्ष आंदोलनामागील प्रचंड जनसमर्थन प्रकट करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन LiFE च्या व्हिजनने प्रेरित होऊन, या मोठ्या प्रयत्नांतर्गत विक्रमी 1 कोटी वृक्षांची रोपे लावण्यात आली हाेती.”, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आसाममध्ये १७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी संपूर्ण राज्यात व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान वृक्ष प्रजातींची १ कोटी (1,11,17,781) रोपे लावण्यात आली. बचत गटाचे सदस्य, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शैक्षणिक संस्था, पोलीस कर्मचारी, चहाबागेचे कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम नाेंदवला गेला होता.
नऊ श्रेणींमध्ये नऊ विक्रम
आसाम राज्याच्या पर्यावरण आणि वन विभागाने सुरू केलेल्या अमृतवृक्ष आंदोलनादरम्यान नऊ श्रेणींमध्ये नऊ विक्रमांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ नाेंद झाली आहे. पहिल्या प्रकारात सकामरूप पूर्व वनविभागाने पशुवैद्यकीय महाविद्यालय फील्ड, खनापारा, गुवाहाटी येथे कुंडीतील रोपांची लावण करण्याचा विक्रम केला. 3 लाख (3,22,444) पॉली पॉटेड रोपांची तब्बल 22.22 किमी लांब एकाशेजारी एक ठेवण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये ही राेपे लावण्यात आली. असा विक्रम नाेंद हाेण्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची पहिलीच वेळ हाेती.
#WATCH | Assam CM Himanta Biswa Sarma tweets, “The 9 Guinness World Records received today manifests the tremendous public support behind Amrit Brikshya Andolan. Inspired by PM Narendra Modi’s vision of Mission LiFE, a record 1 crore tree saplings were planted under this… pic.twitter.com/iAmwMImsIZ
— ANI (@ANI) November 30, 2023
प्रयागराज येथे वितरित 76,825 रोपांचा विक्रम मोडला
दुसर्या प्रकारच्या विक्रमात २४ तासांमध्ये एकाच ठिकाणी वाटप केलेल्या रोपांची सर्वात मोठी संख्या नाेंदली गेली. आसाममधील खनापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात सर्पिल स्वरूपात लावलेली रोपे बचत गटाच्या सदस्यांना, सार्वजनिक, निमलष्करी दलांना वाटण्यात आली होती. शैक्षणिक संस्थांना एकूण ३ लाख २२ हजार444 रोपांचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाने उत्तर प्रदेश वनविभागाने 2018 साली प्रयागराज येथे वितरित केलेल्या 76,825 रोपांचा यापूर्वीचा विक्रम मोडला होता.
भैरबकुंडा राखीव जंगलात १०० हेक्टर वनजमिनीत रोपांची लागवड
तिसरा विक्रम हा उदलगुरी जिल्ह्यातील भैरबकुंडा राखीव जंगलात 24 तासांत 100 हेक्टर वनजमिनीत 9,21,730 रोपांची यशस्वीपणे लागवड करून नाेंदवला गेला होता. यापूर्वी 2013 मध्ये पाकिस्तानने थट्टा जिल्ह्यातील खरोचन येथे 8,47,275 वृक्षारोपण करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होता. भारताने 9,21,730 रोपांची यशस्वीपणे लागवड करत नवा विक्रम आपल्या नावावर नाेंदवला आहे.
एका तासात एका चमूने केली सर्वाधिक राेपांची लावण
एका तासात एका चमूने लावलेली सर्वाधिक झाडे असलेल्या चौथ्या प्रकारात ८,९०० लोकांच्या चमूने एका तासात एकूण ३,३१,९२९ रोपांची यशस्वीपणे लागवड करून विक्रम केला.
Amrit Brikshya Andolan : कुंडीतील रोपटे मोझॅकचा विक्रम
पाचव्या विक्रमामध्ये सर्वात मोठे कुंडीतील रोपटे मोझॅक समावेश आहे, तिनसुकिया जिल्ह्यात डिगबोई वनविभागाने 8,563.01 चौरस मीटरमध्ये कुंडीतील रोपटे मोझॅकचा विक्रम नाेंदला केला. आसामच्या नकाशाचे चित्रण करून आणि मोज़ेकच्या मध्यभागी गेंडा दाखवून तयार केले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नवीन श्रेणी आहे.हे मोज़ेक बनवण्यासाठी एकूण 6,32,000 रोपांचा वापर करण्यात आला.
58 सेकंदात एकाच वेळी 1,229 आगर रोपांची लागवड
शिवसागर जिल्ह्यातील गेलेकी येथे एकूण 1,229 विद्यार्थिनींनी 58 सेकंदात एकाच वेळी 1,229 आगर रोपांची लागवड करून सहावा विक्रम नाेंदवला गेला. .
ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
11 सप्टेंबर रोजी आसामचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि आसामच्या वन दलाचे प्रमुख यांनी पर्यावरण संवर्धन आणि टिकाऊपणा या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण 70,490 लोकांनी लाईव्ह पाहिले तर तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी हे प्रशिक्षणाचे
रेकॉर्डिंग पाहिले, हा सातवा विक्रम ठरला.
ऑनलाइन अपलोड करण्यात आल्याने विक्रम
आठव्या श्रेणीत अमृत वृक्ष आंदोलन पोर्टलवर झाडे लावणाऱ्या लोकांची एकूण 71,82,358 छायाचित्रे (वनस्पतींसह अद्वितीय चेहरे असलेली अद्वितीय प्रतिमा) ऑनलाइन अपलोड केली हाेती. एवढ्या माेठ्या प्रमाावर पाेर्टलवर झाडांची छायाचित्र करण्याचा अपलाेड करण्याचा हा विक्रम ठरला.
Amrit Brikshya Andolan : सर्वाधिक प्रतिज्ञा
अमृत वृक्ष आंदोलनादरम्यान व्यक्तींनी झाडे लावण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि गिनीज बनवण्यासाठी एकूण 47,28,898 ऑनलाइन प्रतिज्ञा घेतल्या असून हा जागतिक विक्रम ठरला आहे.
“आसामची अर्थव्यवस्था जंगलांच्या माध्यमातून मजबूत करण्यासाठी”
आसाम सरकारच्या अमृत वृक्ष आंदोलन उपक्रमाबाबत बाेलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, अमृत वृक्ष आंदोलन हे आसामची अर्थव्यवस्था जंगलांच्या माध्यमातून मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाच्या जनभागीदारी मॉडेलचेही कौतुक केले, ज्यामुळे समाजातील विविध घटकांतील लोकांना सहभागी होण्यास आणि राज्याच्या हरित व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी त्यांच्या बोलींमध्ये जागतिक विक्रम निर्माण करता आला.
मुख्यमंत्री सरमा यांनी चळवळीला मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या आणि त्यात सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे प्रयत्न ऑनलाइन अपलोड केल्याबद्दल त्यांनी राज्यातील सर्व घटकांचे आभार मानले. संपूर्ण आंदोलन लाईनवर नेणे हा ‘नव्या आसाम’चा दाखला आहे. आसाम आणि तेथील लोकांना राज्याला अनेक विक्रम प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्यासाठी उदारता दाखविल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
तीन कोटी आणि पाच कोटी रोपे लावण्याचाही राज्य सरकार प्रयत्न
2024 आणि 2025 या वर्षात अनुक्रमे तीन कोटी आणि पाच कोटी रोपे लावण्याचाही राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2025 मध्ये नवी दिल्ली येथे 25,000 बिहुआ आणि बी च्या सहभागाने बिहू नृत्याचे आयोजन करून राज्य सरकार आणखी एक विक्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सरमा यांनी सांगितले.
हेही वाचा :
Janata Raja : आसाममध्ये ‘जाणता राजा’ नाटकाचे प्रयोग करणार : हेमंता बिस्वा सरमा
‘मुस्लिम द्वेष भारतात आणावा हीच त्यांची योजना; आव्हाडांचे आसामच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
Assam Child Marriage News | आसाममध्ये बालविवाह प्रकरणी मोठी कारवाई; ८०० जणांना अटक
The post आसामच्या ‘अमृत वृक्ष’ने नाेंदवले तब्बल ९ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाम सरकारच्या ‘अमृत वृक्ष आंदोलन’च्या (Amrit Brikshya Andolan) माध्यमातून १७ सप्टेंबर २०२३ रोजी संपूर्ण राज्यात तब्बल एक कोटी रोपांची लागण करण्यात आली होती. या उपक्रमाने तब्बल ९ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत.बुधवारी (दि.२९) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे आयोजित कार्यक्रमात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून …
The post आसामच्या ‘अमृत वृक्ष’ने नाेंदवले तब्बल ९ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! appeared first on पुढारी.
