राजपिंपरी येथे स्क्रु निघाल्याने पवनचक्कीचा अपघात

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : राजपिंपरी येथील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंभीतांडा परिसरातील 24 क्रमांकाची पवनचक्की कोसळल्याची मोठी दुर्घटना गुरुवारी (दि.6) सकाळी 10 च्या सुमारास घडली. यामध्ये पनामा (O2) या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, टेंभीतांडा परिसरात विजनिर्मितीसाठी पवनचक्क्या बसवलेल्या आहेत. दरम्यान गुरुवारी (दि.6) …

राजपिंपरी येथे स्क्रु निघाल्याने पवनचक्कीचा अपघात

गेवराई, Bharat Live News Media वृत्तसेवा : राजपिंपरी येथील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंभीतांडा परिसरातील 24 क्रमांकाची पवनचक्की कोसळल्याची मोठी दुर्घटना गुरुवारी (दि.6) सकाळी 10 च्या सुमारास घडली. यामध्ये पनामा (O2) या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टेंभीतांडा परिसरात विजनिर्मितीसाठी पवनचक्क्या बसवलेल्या आहेत. दरम्यान गुरुवारी (दि.6) अचानक एका पात्याचा मोठा स्क्रु तुटल्याने पवनचक्कीचे एक पाते खाली कोसळले. उर्वरित दोन पात्यांचा समतोल न राहिल्यामुळे  पवनचक्की खाली पडून जमीन दोस्त झाली आहे. यावेळी सुरक्षारक्षक घरी असल्याने कोणतीही जीवित हाणी झालेली नाही. यानंतर पनामा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देवून नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. यासोबतच उर्वरित पवनचक्कींच्या ठिकाणी अशा काही दुरुस्त्या असतील तर तात्काळ कंपनीने त्या दुर कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा :

Breaking news : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जळगावातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
CISF महिला गार्डची खासदार कंगना रनौत यांना मारहाण, चंदीगड विमानतळावरची घटना
धुळ्यातील अनधिकृत होल्डिंग काढण्याच्या मोहिमेस सुरुवात