Breaking news : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जळगावातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रशियातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत जळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी तर तिसरा विद्यार्थी भडगाव तर चौथा यावल येथील असल्याची माहिती मिळाली समोर आली आहे. याबाबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली. हे चारही विद्यार्थी  रशियातील सेंट पीटर्सबर्ग मधील नॉबबोर्ड …

Breaking news : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जळगावातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : रशियातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत जळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी तर तिसरा विद्यार्थी भडगाव तर चौथा यावल येथील असल्याची माहिती मिळाली समोर आली आहे. याबाबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली.
हे चारही विद्यार्थी  रशियातील सेंट पीटर्सबर्ग मधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत होते. मंगळवारी (दि. ४) संध्याकाळी सेंट पीटर्सबर्गजवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून हे चौघांचा बुडून मृत्यू झाला. जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी, गुलामगज मोहम्मद याकूब मलिक व हर्षल देसले, अशी या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.  चार पैकी हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला इतर तीनही विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची जिल्हाधिकारी यांची माहिती दिली आहे.
या घटनेची माहिती रशिया येथील प्रशासनाने व पोलिसांनी भारतीय दूतावासाला दिली. त्यानंतर भारतीय दूतावास यांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. व मृत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधत त्यांनाही याची माहिती दिली. चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. एका विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला असून इतर तिघांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. एका विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून त्याबाबत भारतीय दूताभास यांच्या माध्यमातून आपला रशिया प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
हेही वाचा :

मोठी बातमी : इस्रायलचा गाझातील शाळेवर हल्ला; २७ ठार
नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २५ वर्षे सश्रम कारावास
परभणी : माजलगाव – नांदेड राज्य महामार्गावर अपघात, वडील-मुलाचा मृत्यू