धुळ्यातील अनधिकृत होल्डिंग काढण्याच्या मोहिमेस सुरुवात

धुळे पुढारी वृत्तसेवा– धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बेकायदेशीर व अनाधिकृत होर्डिंग बॅनर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आज मालेगाव रोडवरील बॅनर हटवण्यात आले. दरम्यान बॅनर असोसिएशनने केलेल्या विनंतीनुसार महानगरपालिकेने होल्डिंग उतरवण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र त्यानंतर शहरातील सर्व अनधिकृत होल्डिंग काढले जाण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी …

धुळ्यातील अनधिकृत होल्डिंग काढण्याच्या मोहिमेस सुरुवात

धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा– धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बेकायदेशीर व अनाधिकृत होर्डिंग बॅनर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आज मालेगाव रोडवरील बॅनर हटवण्यात आले. दरम्यान बॅनर असोसिएशनने केलेल्या विनंतीनुसार महानगरपालिकेने होल्डिंग उतरवण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र त्यानंतर शहरातील सर्व अनधिकृत होल्डिंग काढले जाण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे.
मुंबई येथील घाटकोपर व वडाळा येथे अनाधिकृत होर्डिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जिवित व वित्तहानी झाली होती. त्याची पुर्नरावृत्ती शहरात घडू नये म्हणून धुळे शहरात पावसाळयामुळे वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी शहरातील बेकायदेशीर व अनाधिकृत असलेले होर्डिंग बॅनर काढण्याची मोहिम शासन आदेशानुसार आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त हेमंत निकम व सहायक आयुक्त समीर शेख यांच्या नियंत्रणात आज पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेले आहेत.
आज मालेगांव रोडवरील डि मार्टजवळील 3 व शंभर फुटी रस्त्यावरील 1 अनधिकृत होर्डिंग कटर मशीन व्दारे उतरविण्यात आले आहे. याबाबत होर्डिंग असोसीऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानुसार संबंधित होर्डिंग मालकांना होर्डिंग उतरविण्यासाठी ३ दिवसाची अंतिम मुदत देण्यात आलेली असून मुदतीत होर्डिंग न हटविल्यास सोमवारपासून पुन्हा मनपामार्फत मोहिम सुरू करण्यात येणार आहे.
आज झालेल्या मोहिमेत सहायक अभियंता चंद्रकांत उगले, शाखा अभियंता एन.के. बागूल, अतिक्रमण विभागप्रमुख प्रसाद जाधव, भांडारपाल राजेंद्र माईनकर तसेच मनपाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.