काँग्रेसचे शतक! सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा बिनशर्त पाठिंबा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आज (दि. ६) काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आज त्यांनी विश्वजित कदम यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिक्कार्जून खर्गे यांची भेट घेत काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.
याबाबत बोलताना पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने अटीतटीच्या सामन्यादरम्यान ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी, यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिक्कार्जून खर्गे यांची भेट घेत यांच्याकडे पत्र देत काँग्रेसला पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच काँग्रेस पक्षाच्या सोबती, इंडिया आघाडीसोबत आम्ही पार्लमेंटमध्ये काम करणार आहे, असं आश्वासनही त्यांना दिल्याचे विशाल पाटील यानी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
शेअर बाजारात घोटाळा, मोदी-शहांच्या सल्ल्याने गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटींचे नुकसान : राहुल गांधी
केंद्रात एनडीए सरकार येताच, महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
Hemant Godse | काही लोकांनी माझे काम केले नाही, पराभवानंतर हेमंत गोडसेंचा भुजबळांवर निशाणा