पंकजा मुंडे संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा

परळी वैजनाथ- पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे संपूर्ण जिल्ह्याचा आभार दौरा करणार आहेत. त्यांनी पराभवानंतरही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि खंबीरपणा दाखवला आहे. यातच आता पंकजा मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात आपण लवकरच आभार दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अधिक वाचा – …

पंकजा मुंडे संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा

परळी वैजनाथ- Bharat Live News Media वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे संपूर्ण जिल्ह्याचा आभार दौरा करणार आहेत. त्यांनी पराभवानंतरही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि खंबीरपणा दाखवला आहे. यातच आता पंकजा मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात आपण लवकरच आभार दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.
अधिक वाचा –

नितीन गडकरींना उत्तर वगळता पाचही मतदारसंघात आघाडी

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरण करणारी निवडणूक झाली. अशा विपरीत आणि कठीण परिस्थितीत झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी शेवटपर्यंत लढा दिल्याचे निकालानंतर दिसून आले. या पराभवानंतर स्वस्थ न बसता बीड जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रेम आणि सन्मान मतांच्या माध्यमातून आपल्याला दिला. याचे सदैव ऋण आपल्यावर असणारच आहे, असे म्हणत लवकरच आपण संपूर्ण बीड जिल्ह्याचा आभार दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. येत्या १२ जून किंवा १५ जून पासून बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण आभार दौऱ्याच्या निमित्ताने जाणार असून बीड जिल्ह्यातील तमाम जनतशी संवाद साधणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –

नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आमदार प्रवीण पोटेंचा राजीनामा