मलाड मध्ये होर्डिंग पडून ज्येष्ठ नागरिक जखमी

मालाड पुढारी वृत्तसेवा : मालाड पश्चिमेतील चाचा नेहरू उद्यानालगत असलेली शंभर फुटाची होर्डिंग पडून ज्येष्ठ नागरिक जखमी. महेंद्र कुर्लेकर (वय 62 वर्षे) असे जखमीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.५) संध्याकाळी घडली. माहितीनुसार, महेंद्र कुर्लेकर आपल्या मुलाचा स्केटिंगचा सराव झाल्यानंतर घरी जात होते. दरम्यान अचानक सुमारे शंभर फुटाची जेपीव्ही कंपनीची होर्डिंग अंगावर पडली. प्रसंगावधानाने कुर्लेकर …

मलाड मध्ये होर्डिंग पडून ज्येष्ठ नागरिक जखमी

मालाड Bharat Live News Media वृत्तसेवा : मालाड पश्चिमेतील चाचा नेहरू उद्यानालगत असलेली शंभर फुटाची होर्डिंग पडून ज्येष्ठ नागरिक जखमी. महेंद्र कुर्लेकर (वय 62 वर्षे) असे जखमीचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.५) संध्याकाळी घडली.
माहितीनुसार, महेंद्र कुर्लेकर आपल्या मुलाचा स्केटिंगचा सराव झाल्यानंतर घरी जात होते. दरम्यान अचानक सुमारे शंभर फुटाची जेपीव्ही कंपनीची होर्डिंग अंगावर पडली. प्रसंगावधानाने कुर्लेकर यांनी आपल्या सहा  वर्षीय मुलाला ढकलल्याने तो वाचला. होर्डिंग पडल्यावर कुर्लेकर  जमिनीवर पडले. डोकं  जमिनीवर आपटल्याने त्यांना मुक्का मार लागला असल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर कुर्लेकर यांनी कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. जयेश साने यांनी त्यांना कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालतात नेले व उपचार करून त्यांचा सिटी स्कॅन करून त्यांना घरी पाठवले. मात्र त्यांना त्रास होत असल्याने घरच्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले तिथे त्यांना दाखल करून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. दरम्यान पालिका आणि पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा तपास करत आहे.
हेही वाचा 

Nashik Crime | ‘माझ्याकडे काय बघतो’ अशी कुरापत काढून कॉलेजरोडवरील कॅफेत एकास मारहाण
Rajabhau Waje | गद्दारांना धडा शिकवल्याने वाजेंच्या पाठीवर शाबासकीची थाप, उद्धव ठाकरेंची घेतली भेट