मोठी बातमी : इस्रायलचा गाझातील शाळेवर हल्ला; २७ ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इस्रायलने गाझातील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात २७ लोक ठार झाले आहे. या शाळेत हमासचे दहशतवादी लपले होते, त्यामुळे ही कारवाई केल्याचे इस्रायलने म्हटले आहेत. तर स्थानिक माध्यमांनी या शाळेत विस्थापितांनी आश्रय घेतला होता, असे म्हटले आहे.
मध्य गाझातील नुसिरात येथे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने सुरू असलेल्या शाळेवर हा हल्ला झाला. या शाळेत गाझाची एक गुप्त तुकडी कार्यरत असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. ७ ऑक्टोबर २०२३ला हमासने इस्रायलवर जो हल्ला केला होता, त्यात सहभागी काही दहशतवादी या शाळेत लपले होते, त्यामुळे ही कारवाई केल्याचे इस्रायलच्या वतीने सांगण्यात आले.
तर हमासच्या गाझातील सरकारच्या वतीने हा दावा फेटाळण्यात आले आहे. इस्रालय खोटी माहिती पसरवत आहे. सर्वसामान्य नागरिकांवर इस्रायल हल्ले करत आहे, आणि त्याच्या समर्थनात इस्रायल ही खोटी वक्तव्य करत आहे, असे हमासने म्हटले आहे.
पॅलेस्टिनमध्ये युद्धानंतरची राजकीय व्यवस्था कशी असली पाहिजे, यावर फताह पक्षाचे अध्यक्ष आणि पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमदू अब्बास आणि हमासचे प्रतिनिधी यांच्यात चीनमध्ये बैठक होणार आहे जून महिन्याच्या मध्याला ही बैठक होणे अपेक्षित आहे. यापूर्वी अशा दोन बैठका चीन आणि रशियात झालेल्या आहेत.
हेही वाचा
‘मधुमेह, हृदयविकार संशोधनातील माहिती संकलनाचा पहिला टप्पा पूर्ण : डॉ. एन. कलईसेल्व्ही
Lok Sabha Results : खलिस्तानी समर्थक अमृतपाल, सरबजीतच्या ‘लोकसभा’ विजयाने देशाच्या सुरक्षेसाठी धोका?