जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
मेष : अनेक माध्यमांतून आर्थिक लाभ होतील. ज्या व्यक्तीवर विश्वास आहे, अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही. इतरांवर टीका करू नका.
वृषभ : ध्यानधारणा आराम मिळवून देईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन : स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घ्या. त्याचा फायदा होईल. यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.
कर्क : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा. आजच्या दिवशी मित्रांपासून सावध राहा.
सिंह : तुम्ही आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. आर्थिक आवक चांगली होईल.
कन्या : ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. संध्याकाळी प्रेमोत्सुक व्हाल. नवीन उपक्रम, उद्योगामुळे योग्य परतावा मिळण्याची शक्यता.
तूळ : कामाच्या धबडग्यात थोडा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. येणी वसूल होतील.
वृश्चिक : किमती वस्तू हरवू शकतात. घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
धनु : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. उल्हसित मन योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल.
मकर : ज्यांनी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर गुंतवणूक केली होती, त्यांना आज त्या गुंतवणुकीच्या फायद्याची पूर्ण शक्यता.
कुंभ : तुमच्या प्रेमी जीवनात नवीन वळण येईल. साथीदार आज तुमच्याशी विवाहाची बोलणी करू शकतात. याबाबत तुम्हाला विचार केला पाहिजे.
मीन : आर्थिक स्थितीतील बदल नक्कीच होणार आहेत. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. विचारपूर्वक कृती करा.
– ज्यो. मंगेश महाडिक