फेसबुकद्वारे कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारातून गायकवाड बचावले होते. आता पुन्हा एकदा फेसबुक अकाऊंटद्वारे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक वरुन दिपक कदम नावाच्या इसमाने ही धमकी दिली आहे. …

फेसबुकद्वारे कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

डोंबिवली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारातून गायकवाड बचावले होते. आता पुन्हा एकदा फेसबुक अकाऊंटद्वारे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक वरुन दिपक कदम नावाच्या इसमाने ही धमकी दिली आहे.
जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कार्यालयात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. या घटनेला काही महिने उलटत नाही तोवर महेश गायकवाड यांना पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
फेसबूक अकाऊंटवरुन दिलेल्या या धमकीत “आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या, मी आठ गोळ्या घालीन”, अशी जीवे मारण्याची धमकी कदम याने महेश गायकवाड यांना दिली आहे. सोशल मिडियाद्वारे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी फेसबूक अकाऊंटद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दीपक कदम नावाच्या इसमाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या संदर्भात बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, ”तीन महिन्यांपूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता. त्यातील काही आरोपी अजून पसार आहेत. त्या हल्ल्यातील आरोपीचे नाव घेऊन मला धमकी दिली. या घटनेला तीन महिने उलटले. मात्र फरार आरोपींना अद्याप पकडले नाही. यामध्ये कुणाचा राजकीय दबाव आहे, ते मी काही दिवसांनी सांगेनच. तथापि पोलिसांनी या फरार आरोपींना तात्काळ अटक करावी. आताच्या धमकीबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दाखल करत अटक करू असा आश्वासन दिल्याचे शहरप्रमुख गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा :

भेंडाळा येथे अवैध गॅस अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून 1 कोटी 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव: उमरगा येथे न्यायालयाच्या इमारतीचा काच तावदान सांगाडा कोसळला
३५०वा राज्याभिषेक दिन : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी रायगडची निर्माती कशी केली?