शनी जयंती विशेष : शनी शिंगणापुरातील स्वयंभू मूर्ती कशी प्रकटली? जाणून घ्या पुराण कथा
शनिशिंगणापुर मुलखावेगळे गाव
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्र, भारतदेशासह परदेशातही परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर ३५० वर्षांहून अधिक जुने असल्याचा अंदाज आहे . स्थानिक आख्यायिकेनुसार येथील शनिदेवाची मूर्ती स्वयंभू असून मंदिर जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. येथे एक मोठा काळा दगड आहे जो स्वतः भगवान शनिचे स्वरूप मानले जाते.
अख्यायिका –
एकदा शिंगणापूर गावात पूर आला तेव्हा ही शनिदेवाची मूर्ती त्या पुरात वाहून गेली आणि झाडात अडकली. एका मेंढपाळाने मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला असता मूर्तीला रक्तस्त्राव सुरू झाला. हे पाहून तो घाबरला आणि घाबरून लगेच पळून गेला. पण, त्या रात्री शनिदेव त्यांच्या स्वप्नात दिसले आणि त्यांना सांगितले की त्यांना त्यांची मूर्ती सापडली आहे, जी त्यांचे स्वंभू स्वरूप आहे आणि गाव संरक्षित ठेवण्यासाठी या मूर्तीची दररोज पूजा केली पाहिजे.
त्यानंतर ग्रामस्थांनी या शिळेची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून शनिदेवाच्या नावाने शिंगणापूरला शनि शिंगणापूर म्हटले जाते. शिंगणापूर गावाची आकर्षक गोष्ट म्हणजे येथील कोणत्याही घराला कुलूप नाही. असे मानले जाते की शनिदेव स्वतः या गावाचे सर्व संकटे, अपघात आणि चोरीपासून संरक्षण करतात. अलिकडच्या काही वर्षांत, भाविकांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी मंदिराचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण आणि विस्तार करण्यात येत आहे.
दर शनिवार तसेच शनि अमावस्या व शनी जयंतीच्या वेळी येथे विशेष उत्सवाचे आयोजन केले जात असते यावेळी १० ते १२ लाख भाविकांची उपस्थिती असते
देवस्थानचे उपक्रम
१) श्री शनेश्वर ग्रामीण रुग्णालय शनिशिंगणापूर येथे ६० बेडचे मल्टीस्पेशलिटी रुग्णालय
२) गोशाळा – २००८ साली हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून या गोशाळेमध्ये १५० देशी गाई आहेत
३)परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हायस्कूल
४) पानसतिर्थ सुशोभीकरण प्रकल्प-पानसनाला नदीत शनि देवाची स्वयंभू शिळा वाहून आली आहे अशी आख्यायिका असल्याने सुशोभीकरणाचा प्रकल्प देवस्थानच्या विश्वस्तांनी हाती घेतला आहे यात ७५ फूट उंचीचा ग्रॅनाईट दीपस्तंभ, घाट प्लॅटफॉर्म दर्शनपथ, नवग्रह मंदिर, सप्ततीर्थ, लँडस्केपिंग, जलबंधारा, ७ पाषाणी मंदिर.
हेही वाचा :
Weekly Horoscope | साप्ताहिक राशीभविष्य, ३ ते ९ जून २०२४
आज मंगळाचा मेष राशीत प्रवेश; ‘या’ राशी मालामाल; तर ‘या’ राशींना धोका
पोटात पाणी होणे, जाणून घ्या ‘जलोदर’ची लक्षणे आणि उपाय