जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक लाच घेताना रंगेहात जाळ्यात

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यात लाच घेणाऱ्यांसाठी कर्दनकाळ असणारे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी बुधवारी (दि.5) पुन्हा दबंग कारवाई केली. शेळकेंसह त्यांच्या टीमने सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला 2500 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. सचिन शिवाजीराव बांगर (वय.39) असे लाच घेणाऱ्या अधिकार्याचे नाव आहे. बांगर वाशिम सामान्य रुग्णालयातील वर्ग तीनचे अधिकारी होते. आरोपी …

जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक लाच घेताना रंगेहात जाळ्यात

वाशिम, Bharat Live News Media वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यात लाच घेणाऱ्यांसाठी कर्दनकाळ असणारे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी बुधवारी (दि.5) पुन्हा दबंग कारवाई केली. शेळकेंसह त्यांच्या टीमने सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला 2500 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. सचिन शिवाजीराव बांगर (वय.39) असे लाच घेणाऱ्या अधिकार्याचे नाव आहे. बांगर वाशिम सामान्य रुग्णालयातील वर्ग तीनचे अधिकारी होते. आरोपी विरुद्ध वाशीम शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय तक्रारदार यांचे पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती अहवाल तपासून त्याच्यावर सही शिक्का देण्याकरिता बांगर यांनी 3 हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडी नंतर अडीच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच लाचलुचपत विभागाने लावलेल्या जाळ्यात 2500 रुपयांची लाच घेताना सापडले. या घटनेनंतर त्यांच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Nashik Bribe | लासलगावला पोलिस नाईक लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
Jalgaon Bribe News | 25 हजाराची लाच मागणाऱ्या महिला तलाठ्याविरुद्ध गुन्हा
Nashik Bribe News | अवघ्या पाचशे रुपयांची लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात