उमेदवार बदलल्याचा फटका बसला, आत्मचिंतनाची गरज : कृपाल तुमाने

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ‘लोकसभा निवडणुकीपुर्वी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसनेत मोठ्या घडामोडी घडल्या. निकालानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यात महायुतीस अपेक्षेप्रमाणे जागा जिंकण्यात अपयश आले. राज्यात जर उमेदवार बदलेले नसते तर त्याचा फटका बसला नसता. या झालेल्या गोष्टीवर आत्मचिंतनाची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया माजी खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार …

उमेदवार बदलल्याचा फटका बसला, आत्मचिंतनाची गरज : कृपाल तुमाने

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘लोकसभा निवडणुकीपुर्वी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसनेत मोठ्या घडामोडी घडल्या. निकालानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यात महायुतीस अपेक्षेप्रमाणे जागा जिंकण्यात अपयश आले. राज्यात जर उमेदवार बदलेले नसते तर त्याचा फटका बसला नसता. या झालेल्या गोष्टीवर आत्मचिंतनाची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया माजी खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उमेदवार राजू पारवे यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
तुमाने म्हणाले, विदर्भातील रामटेक, यवतमाळमध्ये भावना गवळी आणि अमरावतीत आनंदराव अडसूळ यांना तिकीट दिले असते तर वेगळे चित्र असते. माझ्या पक्षातून मला कधीच विरोध झाला नाही, असे सूचक संकेत देतानाच माझ्या पाठीशी मुख्यमंत्री होते. कालच मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली असून विधानसभेसाठी आम्ही लवकरच कामाला लागणार आहोत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विधानसभेचे उमेदवार लवकर ठरविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करा, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारला असता तुमाने म्हणाले, फडणवीस यांची महायुती सरकारला, राज्याला गरज आहे. त्यांनी किंबहुना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोठी मेहनत घेतली होती. मात्र, मविआ नेत्यानी जनतेची दिशाभूल करत निकाल फिरवले. आता याबाबत अधिक न बोलता जे झाले ते झाले. पुढच्या तयारीला आम्ही लागलो असून राज्यात महायुतीचे सरकार आणणार आहोत असा दावाही तुमाने यांनी केला.
हेही वाचा : 

NDA ने नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा नेता म्हणून निवडले, 10 अतिरिक्त खासदारांचाही मिळाला पाठिंबा
Lok Sabha 2024 : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? पहा ज्योतिषशास्त्र काय सांगते…
फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन योगींना बाजूला करण्याचा प्रयत्न : संजय राऊतांचा दावा