पंड्या-बुमराहच्या मा-यापुढे आयर्लंडचे लोटांगण, भारताला 97 धावांचे लक्ष्य
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : आयरिश संघ 16 षटकांत 96 धावांत गारद झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयरिश संघाकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
आयर्लंडचा डाव
आयर्लंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबर्नीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टर्लिंग दोन तर बालबिर्नी पाच धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्याचा कहर पाहायला मिळाला. त्याने लॉर्कन टकर (10), कर्टिस कान्फर (12) आणि मार्क एडेअर (3) यांना बाद केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने हॅरी टेक्टर (4) आणि जोशुआ लिटल (14) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सिराजने जॉर्ज डॉकरेलला (3) तर अक्षर पटेलने बॅरी मॅककार्थीला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डेलानी शेवटची विकेट म्हणून नो बॉल फ्री हिटवर धावबाद झाला.
भारताकडून हार्दिकने तीन बळी घेतले. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
न्यूयॉर्कमधील हा दुसरा सामना आहे ज्यात सलग तिस-या डावात 100+ धावा झालेल्या नाहीत. यापूर्वी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात श्रीलंकेचा संघ 77 धावा करू शकला होता, तर दक्षिण आफ्रिकेने त्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. आता या यादीत आयरिश संघही सामील झाला आहे.
दोन्ही संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅकार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.