नांदगाव पोलिसांकडून ७९ जनावरांची सुटका, तीन आयशर पकडल्या

नांदगाव पुढारी वृत्तसेवा; नांदगाव पोलिसांनी गुजरात ते नगर च्या दिशेने बेकायदेशीर जनावरे वाहतूक करत असलेल्या तिन आयशर गाड्या पकडल्या आहेत. या कारवाईत २१ लाख १ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी नांदगाव रेल्वे ओव्हरब्रिजजवळ तीन आयशर गाड्या गुजरात ते नगर … The post नांदगाव पोलिसांकडून ७९ जनावरांची सुटका, तीन आयशर पकडल्या appeared first on पुढारी.
#image_title

नांदगाव पोलिसांकडून ७९ जनावरांची सुटका, तीन आयशर पकडल्या

नांदगाव पुढारी वृत्तसेवा; नांदगाव पोलिसांनी गुजरात ते नगर च्या दिशेने बेकायदेशीर जनावरे वाहतूक करत असलेल्या तिन आयशर गाड्या पकडल्या आहेत. या कारवाईत २१ लाख १ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी नांदगाव रेल्वे ओव्हरब्रिजजवळ तीन आयशर गाड्या गुजरात ते नगर च्या दिशेने जात होत्या. या गाड्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने जनावरे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि तीनही गाड्या पकडल्या. कारवाई दरम्यान, गाड्यांमध्ये दोरीच्या साह्याने ७९ जनावरे कोंबून ठेवलेली आढळून आली. यामध्ये २ वासरे मृत्य झालेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलीस शिपाई सागर बोरशे यांच्या फिर्यादीवरून रविंद्र वाघ, राकेश दिलीप मगर, तुषार गारेख जाधव (तिघे रा. हेदुणर, ता. जि. धुळे), कुणाल गोरख शिंदे (रा. विंचुर, ता. जि. धुळे), योगेश जिभाऊ मस्दे (रा. डोंगराळे, ता. मालेगाव) यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नांदगाव पोलिसांची कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. तर, मुद्देमाल ताब्यात घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी दिली
हेही वाचा :

Amrit Brikshya Andolan : आसामच्‍या ‘अमृत वृद्धी’ने नाेंदवले तब्‍बल ९ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड!
अवकाळीने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या; वसमतमधील शेतकऱ्यांची मागणी
NAMCO Bank Election : नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

The post नांदगाव पोलिसांकडून ७९ जनावरांची सुटका, तीन आयशर पकडल्या appeared first on पुढारी.

नांदगाव पुढारी वृत्तसेवा; नांदगाव पोलिसांनी गुजरात ते नगर च्या दिशेने बेकायदेशीर जनावरे वाहतूक करत असलेल्या तिन आयशर गाड्या पकडल्या आहेत. या कारवाईत २१ लाख १ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी नांदगाव रेल्वे ओव्हरब्रिजजवळ तीन आयशर गाड्या गुजरात ते नगर …

The post नांदगाव पोलिसांकडून ७९ जनावरांची सुटका, तीन आयशर पकडल्या appeared first on पुढारी.

Go to Source