नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.5) राजधानी दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानात ‘एक पेड माँ के नाम’ या नवीन वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेत देशभरात लाखो झाडे लावली जाणार आहेत.
मोदी यांच्या हस्ते रोपटे लावून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना याप्रसंगी उपस्थित होते.
‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेत देशवासीयांनी आपल्या आईसोबत अथवा तिच्या नावाने एक झाड लावून पर्यावरण रक्षणाचा ध्यास घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. तुम्ही लावलेले झाड ही तुमच्या आईला दिलेली एक अनमोल भेट राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणासाठी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करा, असे आवाहनही मोदी यांनी जगभरातील लोकांना केले.
पर्यावरणदिनी मोदींची ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण मोहीम