बारामतीत आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण?

बारामती : लोकसभा निवडणूकीत मी देईल त्या उमेदवाराला विजयी करा. लोकसभेत दगाफटका केला तर विधानसभेला मला वेगळा विचार करावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा प्रचार काळात केले होते. अजित पवार यांना लोकसभेत दगाफटका झाला असल्याने आता ते विधानसभेबाबत काय भूमिका घेतात, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. विधानसभेला ते लढले तर त्यांच्या विरोधात …

बारामतीत आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण?

राजेंद्र गलांडे

बारामती : लोकसभा निवडणूकीत मी देईल त्या उमेदवाराला विजयी करा. लोकसभेत दगाफटका केला तर विधानसभेला मला वेगळा विचार करावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा प्रचार काळात केले होते. अजित पवार यांना लोकसभेत दगाफटका झाला असल्याने आता ते विधानसभेबाबत काय भूमिका घेतात, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. विधानसभेला ते लढले तर त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.
बारामतीत आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण?

राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट आत्तापासूनच ‘ॲक्टीव्ह’
शर्मिला पवार या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात,
पुतण्या युगेंद्र पवार तीन-चार महिन्यांपासूनच ‘ॲक्टीव्ह’

बारामती लोकसभा मतदारसंघाचा लागलेला निकाल अजित पवार यांची झोप उडविणारा ठरला आहे. ज्या बारामती शहर व तालुक्यावर त्यांना प्रचंड भरोसा होता. तेथेच ते ‘बॅकफूट’वर गेले आहेत. सुमारे ४८ हजाराहून जास्तीचे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने ही प्रचार यंत्रणा हाताळली, त्यावर आता जाहीरपणे बारामतीत चर्चा होवू लागली आहे. मूठभर लोकांनी सगळी सूत्रे स्वतःकडे ठेवली. त्याचा फटका पक्षाला बसला. जनमाणसात प्रतिमा नसलेल्या लोकांकडे कारभार गेल्याचाही फटका बसला आहे.
अजित पवार यांना ‘लोकसभेला दगाफटका
प्रचार काळात येथील व्यापारी मेळाव्यात अजित पवार यांनी ‘लोकसभेला दगाफटका झाला तर मी विधानसभेला वेगळा विचार करेन’ अशी तंबी दिली होती. आता फटका बसायचा तो बसला आहे. ते आता काय भूमिका घेतात, हे स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट आत्तापासूनच ‘ॲक्टीव्ह’ झाला आहे. अजित पवार यांचे सख्ये पुतणे युगेंद्र पवार हे त्याची पायाभरणी करत आहेत. तालुक्यात दुष्काळी भागात शरयू फौंडेशनकडून पाण्यासाठी टॅंकर उपलब्ध करून देणे, अवकाळीने नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करणे, वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मदत मिळवून देणे, विद्यार्थ्याना प्रवेश मिळवून देणे, नोकऱ्य़ांसाठी शब्द टाकणे अशी कामे त्यांनी सुरु केली आहेत.
पुतण्या युगेंद्र पवार ‘ॲक्टीव्ह’
युगेंद्र पवार यांच्याकडे सध्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार व बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ही पदे आहेत. राजकारणात ते गेल्या तीन-चार महिन्यांपासूनच ‘ॲक्टीव्ह’ झाले आहेत. ते विधानसभेचे उमेदवार असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांनीही थेटपणे त्याचा इन्कार केलेला नाही. परंतु त्यांच्या मातोश्री शर्मिला पवार या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा बारामतीत सुरु आहे. त्या गेली दहा वर्षांपासून अधिक काळ शरयू फौंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे बारामती, इंदापूरमध्ये करत आहेत. फौंडेशनतर्फे भव्य मॅरेथाॅन बारामतीत घेत आहेत. अजित पवार यांच्यासारख्या बलाढ्या उमेदवाराला विधानसभेला टक्कर देण्यासाठी कुटुंबा बाहेर तसा सक्षम व्यक्ती सध्या तरी दिसत नाही. परंतु पवार कुटुंबाचा विचार करता अनेकजणांची नावे उमेदवारीसाठी घेता येवू शकतात.
शरद पवार यांनी लक्ष घातल्याने अडचणी वाढणार
लोकसभा प्रचारात अजित पवार यांच्यासोबत आई, पत्नी व दोन मुले या व्यतिरिक्त कुटुंबाचे पाठबळ नव्हते. सगळे पाठबळ सुप्रिया सुळे यांच्या मागे होते. त्यामुळे बारामतीतून त्यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य घेता आले. अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून शरद पवार यांनी बारामतीसह संपुर्ण जिल्ह्याची सूत्रे त्यांच्याकडे दिली होती.शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कधीही त्यानंतर स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही,अजित पवार ठरवतील ती पुर्व दिशा असे त्यांचे धाेरण होते परंतु आता या दोंघानीही बारामती तालुक्यात बारकाईने लक्ष घातले आणि अन्य पवार कुटुंबियांनी सातत्याने जनतेशी संपर्क सुरु ठेवला तर येणारी विधानसभेलाही अजित पवार यांना संघर्ष करायला लागेल, अशी स्थिती आहे.
हेही वाचा 

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा अरुणाचलमध्ये डंका; जिंकल्या ३ जागा
Anjali Damania Vs Ajit Pawar | अजित पवार नार्को टेस्ट कधी करताय? दमानियांनी ‘दादां’चे चॅलेंज स्वीकारलं
पराभवाने कुणीही खचून जायचे नाही; अजित पवार असे का म्हणाले?