वर्धा: अमर काळे यांनी रोखली रामदास तडस यांची हॅटट्रिक
वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा: वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे 81 हजार 648 मतांच्या मताधिक्याने विजयी झालेत. अमर काळे यांनी महायुतीचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव करत हॅटट्रिक रोखली. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वर्धा लोकसभा मतदारसंघाची एकमेव जागा मिळाली. ही लढत प्रतिष्ठेची होती.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निकाल घोषित केला. यावेळी उमेदवार अमर काळे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक अभय नंदन अंबास्था व दिनेश कुमार जांगीड उपस्थित होते. निवडणुकीत अमर शरदराव काळे यांना (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) एकूण मते 5 लाख 33 हजार 106, रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) एकूण मते 4 लाख 51 हजार 458 मते मिळाली.
4 हजार 634 मतदारांनी नोटाला मते दिली.
डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी) एकूण मते 20 हजार 795, अक्षय मेहरे भारतीय (अखील भारतीय परिवार पार्टी) एकूण मते 5 हजार 467, आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी) एकूण मते 1 हजार 828, उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी) एकूण मते 1 हजार 246, कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदराष्ट्र संघ) एकूण मते 1 हजार 61, कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी) एकूण मते 1 हजार 343, दिक्षीता आनंद ( देश जनहित पार्टी) एकूण मते 736, मारोती गुलाबराव उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) एकूण मते 4 हजार 672, डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) एकूण मते 797, प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी) एकूण मते 15 हजार 492, रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) एकूण मते 1 हजार 438, अनिल केशवरावजी घुशे (अपक्ष) एकूण मते 1 हजार 971, अरविंद शामराव लिल्लोरे (अपक्ष) एकूण मते 1 हजार 476, आसीफ (अपक्ष) एकूण मते 15 हजार 182, किशोर बाबा पवार (अपक्ष) एकूण मते 12 हजार 920, जगदीश उध्दवराव वानखडे (अपक्ष) एकूण मते 2 हजार 349, पुजा पंकज तडस (अपक्ष) एकूण मते 2 हजार 135, ॲड. भास्कर मारोतराव नेवारे (अपक्ष) एकूण मते 4 हजार 32, रमेश सिन्हा (अपक्ष) एकूण मते 799, राहुल तु. भोयर (अपक्ष) एकूण मते 689, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव (अपक्ष) एकूण मते 1 हजार 738 व सुहास विठ्ठलराव ठाकरे (अपक्ष) यांना एकूण 7 हजार 648 मते मिळाली. तसेच एकूण 4 हजार 634 मतदारांनी नोटाला मते दिली.
वर्धा लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता भारतीय खाद्य निगम, बरबडी रोड येथे चोख पोलीस बंदोबस्तात मजमोजणी प्रक्रियेची सुरूवात झाली. सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली.
मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून अभय नंदन अंबास्था यांनी देवळी, हिंगणघाट, वर्धा व दिनेश कुमार जांगीड यांनी धामणगाव रेल्वे, मोर्शी व आर्वी या विधानसभा मतदार संघाचे काम पाहिले.
हेही वाचा
वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थापन नियंत्रण कक्षामार्फत 442 तक्रारींचा निपटारा
वर्धा : ५२१ ग्रामपंचायतींत १५ लाखांचे डिजिटल पेमेंट
वर्धा : इठलापूरमध्ये प्रेम संबंधातून तरुण, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; विहिरीत आढळले मृतदेह