११ वर्षांनंतर पुन्हा स्वप्नील-सई अन् अंकुशची मैत्री झळकणार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ए. वी. के पिक्चरस्, व्हिडिओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल. ही टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.
अधिक वाचा-
‘हिरामंडी’च्या आलजेब शर्मीन सेगलने सोडलं मौन; ‘अखेर लोकांनी मला नोटिस केलं..’
चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत.
अधिक वाचा-
Tejashree Pradhan : हं हं..गुलाबी साडी नव्हे…गुलाबी ड्रेसमध्ये लई भारी तेजश्री प्रधान
या चित्रपटाबाबत अमेय खोपकर म्हणतात, ” संजय जाधव यांचासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 3, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!”
”अब शुरू होगा असली ‘खेल’ सब याद रख्खा जायेगा,” किरण मानेंची पोस्ट व्हायरल