कपाशी व्यापाऱ्याला दरोडेखोरांनी १८ लाखांना लुटलं
जळगांव Bharat Live News Media वृत्तसेवा- दुचाकीला कट मारत दोन जणांना लोखंडी टॉमीने मारहाण करून कपाशीचे आलेले १८ लाख ३६ हजारांची रोकड लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जामनेर तालुक्यात घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ३ ते ४ अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथे प्रमोद भागवत काळबैले (वय ३२) हे आपल्या परिवारासह राहतात. कपाशीचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३ जून रोजी रात्री ९.३० वाजता प्रमोद काळबैले हे त्यांच्या सहकाऱ्या सोबत दुचाकीने कपाशीचे आलेले १८ लाख ३६ हजारांची रोकड घेवून माळपिंप्री येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून अज्ञात दोरोडेखोर क्रुझरगाडीने आले व त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात दुचाकीवरील दोघेजण रोडवर पडले. क्रुझर वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी प्रमोद काळबैले यांना लोखंडी टॉमीने मारहाण करून त्यांच्या जवळील रोकड घेवून पसार झाले. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी ४ जून रोजी सकाळी ५ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पोलीसात अज्ञात ३ ते ४ दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहे.
हेही वाचा-
उद्या कोल्हापुरात श्री. शिवछत्रपती यांचे चित्र शिल्प प्रदर्शन
बहीण असल्याचा अभिमान; प्रियंका गांधींची राहुल गांधींसाठी भावनिक पोस्ट