मायावतींनी पराभवाचे खापर फोडले मुस्लिम समाजावर; घेतला ‘हा’ निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क :  लोकसभा निवडणूक निकालानंतर बसपा नेत्या मायावती यांनी आपल्या पराभवाचे खापर मुस्लिम समाजावर फोडले आहे. पुरेसे प्रतिनिधित्व असूनही मुस्लिमांना पक्ष समजण्यात अपयश आले आहे. म्हणूनच, त्यांचा पक्ष पुढील निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना अधिक संधी देण्‍यात देईल.”, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीत बसपला एकही जागा मिळाली नाही. निवडणूक …
 मायावतींनी पराभवाचे खापर फोडले मुस्लिम समाजावर; घेतला ‘हा’ निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  लोकसभा निवडणूक निकालानंतर बसपा नेत्या मायावती यांनी आपल्या पराभवाचे खापर मुस्लिम समाजावर फोडले आहे. पुरेसे प्रतिनिधित्व असूनही मुस्लिमांना पक्ष समजण्यात अपयश आले आहे. म्हणूनच, त्यांचा पक्ष पुढील निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना अधिक संधी देण्‍यात देईल.”, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणुकीत बसपला एकही जागा मिळाली नाही. निवडणूक निकालानंतर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी (दि.५) सांगितले की, पुरेसे प्रतिनिधित्व असूनही मुस्लिम समाजाला त्यांचा पक्ष समजण्यात अपयश आले आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये पक्षाने पुरेसे प्रतिनिधित्व देऊनही मुस्लिम समुदायाने बसपाला काैल दिला नाही. मात्र यंदाच्‍या लाेकसभा निवडणुकीत बसपाने यंदाही एकही जागा जिंकता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत २०२४ मध्ये, बसपच्या मतांची टक्केवारी राष्ट्रीय स्तरावर २.०४ टक्के आणि यूपीमध्ये ९.३९ टक्क्यांवर घसरली आहे.
लोकसभेचे निकाल गांभीर्याने घेईल
मायावतींनी स्‍पष्‍ट केले आहे की, बहुसंख्य अनुसुचित जातींचे मते बसपाच्या बाजूने दिले आहे. मात्र आम्‍हाला यश मिळाले नाही. उत्तर प्रदेशमधील लोकसभेचे निकाल बसपा गांभीर्याने घेईल. प्रत्येक स्तरावर त्याचे विश्लेषण करेल आणि पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलेल. लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये वाढवायची गरज नव्हती आणि ती जास्तीत जास्त चार टप्प्यांमध्ये पूर्ण व्हायला हवी होती. कडक उन्हाचा आणि उष्ण हवामानाचा परिणाम निवडणुकीवर झाला. त्यामुळे मतदानात घट झाली आहे, असा दावाही बसपा प्रमुख मायावती यांनी केला.
हेही वाचा 

LokSabha Elections 2024 : महायुतीला खडकवासल्याच्या बालेकिल्ल्यात खिंडार
Lok Sabha Election Results : मोदींची ‘गॅरंटी चालली १५१ पैकी ८५ मतदारसंघात!, विजयाचा स्‍ट्राईक रेट ५६ टक्‍क्‍यांपर्यंत घसरला
आम्‍ही ‘एनडीए’बरोबरच : चंद्राबाबू नायडूंनी दिला राजकीय चर्चेला पूर्णविराम