फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच मदत करायची आहे : बावनकुळे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची गरज नाही. त्यांनी सरकारमध्ये राहूनच मदत करायची आहे. त्यांच्या नेतृत्वात भविष्यात यश मिळेल. आम्हाला पक्ष संघटना मजबूत करायची आहे. फडणवीस आमची विनंती मान्य करतील, असा विश्वास भापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषद बोलत होते.
राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल, असे त्यांनी आज (दि.५ ) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.