उद्या कोल्हापुरात श्री. शिवछत्रपती यांचे चित्र शिल्प प्रदर्शन
कोल्हापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा; ३५० व्या शिवराज्याभषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील चित्रकार व शिल्पकार श्री. शिवछत्रपती यांचे चित्र शिल्प प्रदर्शन श्री. शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित केले आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार व करवीर संस्थानाचे अधिपती आदरणीय श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते गुरुवारी (दिनांक ६ जून २०२४) रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी संपन्न होणार आहे. हे प्रदर्शन ६ जून ते ९ जून सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व कलारासिकांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात अरुण सुतार, सुनील पंडित, अजेय दळवी, विजय टिपुगडे, मनिपद्मम हर्षवर्धन, राहुल रेपे, ओंकार कोळेकर, पियूष सुतार, विजय उपाध्ये, विवेक कवाळे, राज इंचानाळकर, यश चोडणकर,श्वेता पाटील, साक्षी पांगिरे, कशीश अडसूळ, रोहिणी कांबळे या कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा
लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री फडणवीस
मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा: फडणवीस करणार पक्षश्रेष्ठींकडे विनंती
पप्पू ते राजकुमार..! : विराेधकांनी हिणवले;पण राहुल गांधींनी नेतृत्त्व सिद्ध केलेच