बहीण असल्याचा अभिमान; प्रियंका गांधींची राहुल गांधींसाठी पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी आज (दि.५) एक भावनिक पत्र ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघात विजय मिळविल्याबद्दल आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती सुधारल्याबद्दल कौतुक केले आहे. राहुल गांधी यांची बहीण असल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रियंका …

बहीण असल्याचा अभिमान; प्रियंका गांधींची राहुल गांधींसाठी पोस्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी आज (दि.५) एक भावनिक पत्र ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघात विजय मिळविल्याबद्दल आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती सुधारल्याबद्दल कौतुक केले आहे. राहुल गांधी यांची बहीण असल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधींची राहुल गांधींसाठी भावनिक पोस्ट का?

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजयी
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती सुधारल्याबद्दल कौतुक
राहुल गांधी यांची बहीण असल्याचा मला अभिमान

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला आहे. याबद्दल प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी एक भावनिक पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांच्यावर संशय व्यक्त केला गेला. त्यांच्याविरुद्ध खोटे बोलले गेले. तरी राहुल कधीही मागे हटला नाही. तो सत्यासाठी धाडसाने लढत राहिला. राहुल प्रेम, सत्य आणि दयाळूपणाने लढला. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
राहुल कणखरपणे उभे राहिला. कितीही अडचणी आल्या तरीही विश्वास सोडला नाही. त्याच्याविरोध अनेक आरोप खोटा प्रचार केला. तरीही त्याने सत्यासाठी लढणे सोडले नाही. राग किंवा द्वेषाला आपल्यावर मात करू दिली नाही. ही लढाई प्रेम, सत्य आणि दयाळूपणाने लढली होती. आम्ही त्यांना सर्वात धाडसी म्हणून पाहिले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात मोठ्या फरकाने ते विजयी झाले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता.

“You fought with love, truth and kindness”: Priyanka Gandhi pens emotional note for brother Rahul
Read @ANI Story | https://t.co/LG4XXfd8fQ#PriyankaGandhi #RahulGandhi #Congress #LokSabhaElections pic.twitter.com/uEvQztA8dK
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2024

हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी पंतप्रधान होतील का? संजय राऊत म्हणाले…
Rahul Gandhi: ब्रेकिंग | वायनाड, रायबरेली दोन्ही मतदारसंघात राहुल गांधी आघाडीवर
Exit Poll 2024 : एक्झिट पोलवर राहुल गांधी म्‍हणाले, “सिद्धू मुसेवाला का गाना…”