LokSabha Elections2024 : भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद : अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे …

LokSabha Elections2024 : भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद : अजित पवार

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ’एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान आणि ’एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन तसेच विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो असेही पवार यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा

Lok Sabha Elections : पुणेकरांची पसंती मुरलीधर मोहोळच; रवींद्र धंगेकर पराभूत
सुनेत्रा पवार यांच्या पराभवास राष्ट्रवादीचे पदाधिकारी जबाबदार
सत्तास्थापनेबाबत चर्चा; आज इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक