इंडिया आघाडीने सत्तेचा दावा करावा : उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना रोखू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो हे देशातील जनतेने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. लोकसभेतील विजयानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले …

इंडिया आघाडीने सत्तेचा दावा करावा : उद्धव ठाकरे

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना रोखू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो हे देशातील जनतेने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.
लोकसभेतील विजयानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले असून सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे. छोटे घटक पक्ष आणि इतर अपक्षही इंडिया आघाडीमध्ये एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीसाठी मी दुपारनंतर जाणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. शिवसेना पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आणि हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी एकत्र येण्यामागची भावना होती. ही भावना आजही कायम आहे, असे सांगतानाच उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्वांच्या मताने पंतप्रधानपदाचा चेहरा ठरविला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
घटक पक्षाच्या नेत्यांशी बोलणी सुरू
इतर घटक पक्षाच्या नेत्यांशी काँग्रेस आणि आमचे इतर पक्ष बोलत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनादेखील भाजपने कमी त्रास दिलेला नाही. त्यामुळे ते नक्की विचार करतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. आम्ही नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या विरोधात नाही, तर त्या वृत्तीच्या विरोधात आहे. ती हुकूमशाहीची वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही, हे सर्व देशभक्तांनी ठरवले होते. त्यामुळेच आता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊ देणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या पत्रपरिषदेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, दिवाकर रावते उपस्थित होते.