सत्तास्थापनेबाबत चर्चा; आज इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीत हालचाली सुरू झाल्या असून, आघाडीची आज (दि. ५) दिल्लीत तातडीची बैठक होणार आहे. त्यामुळे देशात नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिसत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीत नसलेल्या काही समविचारी पक्षांशी बोलणी करण्याबाबतही चर्चा होणार आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. याशिवाय नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय : राहुल गांधी
इंडिया आघाडीची पुढील रणनीती आघाडीतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करून ठरविली जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस विरोधात बसणार की सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार यावर विचारले असता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करून सर्व सहमतीने निर्णय घेऊ. पण आमची स्ट्रॅटेजी काय आहे, हे आधीच उघड केले तर मोदी आधीच सावध होतील. लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने जो कौल दिला आहे, तो मला अपेक्षितच होता. जनतेने एकमताने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना नाकारले आहे. संविधान वाचवण्याचे काम देशातील गरीब लोकांनी केले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देत राहुल म्हणाले, जातीनिहाय जनगणना, महालक्ष्मी योजना हे आम्ही जनतेला दिलेले आमचे वायदे आहेत. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
Home महत्वाची बातमी सत्तास्थापनेबाबत चर्चा; आज इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक
सत्तास्थापनेबाबत चर्चा; आज इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक
पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीत हालचाली सुरू झाल्या असून, आघाडीची आज (दि. ५) दिल्लीत तातडीची बैठक होणार आहे. त्यामुळे देशात नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिसत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीत नसलेल्या काही समविचारी पक्षांशी बोलणी करण्याबाबतही चर्चा होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे …