ओडिशात प्रथमच फुलले कमळ!
भुवनेश्वर/नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे गेलेल्या ओडिशा या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात भाजपला अखेर यश आले. इतिहासात प्रथमच या राज्यात 80 जागा जिंकत भाजपने बहुमत मिळविले. गेली 24 वर्षे निर्विवाद सत्तेत असलेल्या बीजू जनता दलाला (बीजेडी) हा ‘जोर का झटका’ मानला जात आहे.
राज्यातील विधानसभेच्या 147 जागांसाठी चार टप्प्यांत मतदान पार पडले होते. अडीच कोटींवर मतदारांनी आपला हक्क बजावल्याने यंदा 74.77 टक्के मतदान झाले. मंगळवारी राज्यातील 70 केंद्रांवर मतमोजणी होऊन रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या भाजपने सत्ता स्थापनेसाठीचा 74 हा जादूई आकडा पार करीत 80 जागांवर विजय मिळविला. पटनायक यांच्या बीजेडीच्या जागा निम्म्याने घटल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. पक्षाला यावेळी अवघ्या 47 जागा जिंकता आल्या. दुसरीकडे 16 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले; तर माकपला एका जागेवर विजय मिळविता आला. तीन अपक्षही निवडून आले आहेत.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हिन्जिली आणि कंटाबांजी मतदारसंघांतून ही निवडणूक लढविली. विशेष म्हणजे या निवडणुकांत भाजपचा प्रादेशिक असा चेहराच नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर पक्षाने ही किमया केली. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने 112 जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळविली होती. भाजपला 23, तर काँग्रेसला अवघ्या 9 जागा जिंकता आल्या होत्या.
… अन् तो विक्रम होता होता राहिला!
या निवडणुकीत बीजेडीला सत्ता मिळाली असती, तर साहजिकच नवीन पटनायक सहाव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले असते. यामुळे देशात हे पद सर्वाधिक काळ भूषविण्याचा विक्रम त्यांच्या नावे झाला असता. सध्या हा विक्रम सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावे असून, त्यांनी 24 वर्षे 167 दिवस हे पद भूषविले आहे.
Home महत्वाची बातमी ओडिशात प्रथमच फुलले कमळ!
ओडिशात प्रथमच फुलले कमळ!
भुवनेश्वर/नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे गेलेल्या ओडिशा या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात भाजपला अखेर यश आले. इतिहासात प्रथमच या राज्यात 80 जागा जिंकत भाजपने बहुमत मिळविले. गेली 24 वर्षे निर्विवाद सत्तेत असलेल्या बीजू जनता दलाला (बीजेडी) हा ‘जोर का झटका’ मानला जात आहे. राज्यातील विधानसभेच्या 147 जागांसाठी …