Lok Sabha Election 2024 Results : सुनील केदार यांनी दाखविले एक हाती वर्चस्व, रामटेकचा गड काँग्रेसच्या ताब्यात
[author title=”राजेंद्र उट्टलवार” image=”http://”][/author]
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी मंत्री सुनील केदार समर्थक श्याम कुमार बर्वे यांच्या विजयाने माजी मंत्री सुनील केदार यांच्या नागपूर जिल्ह्यातील एक हाती वर्चस्वाला पुन्हा पाठबळ मिळाले आहे. भाजप,शिवसेना विरोधात त्यांची ही लढाई होती. रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे यांचा 76,768 मतांनी विजय झाला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव केला. बर्वे यांना सहा लाख 13 हजार 25 तर पारवे यांना 5 लाख 36 हजार 257 मते मिळाली. बसपाचे संदीप मेश्राम यांना 26 हजार 98 मते तर वंचित अपक्ष बहुजन आघाडीचे किशोर गजभिये यांना 24, 383 मते पडली.
काँग्रेस उमेदवार जि.प. माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्जही रद्द करण्यात आला. त्यानंतर त्यांचे पती श्याम कुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार झाले. विरोधकांनी त्यांच्या उमेदवारीवर सातत्याने आक्षेप घेत ते स्पर्धेतच नसल्याचा दावा केला. मात्र आजच्या निकालाने केदार व बर्वे समर्थकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत, काटेकोर नियोजनातून हा विजय खेचून आणला. या निमित्ताने शिवसेनेच्या ताब्यात असलेला रामटेकचा गड काँग्रेसच्या ताब्यात पुन्हा आला. 2014 व 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव करत त्यांनी रामटेक मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आणला होता. शिंदे गटात सामील झाल्यानंतरही शिवसेना व भाजपला नाकारत काँग्रेसच्या आमदाराला शिवसेनेने तिकीट दिले यातून महायुतीत असलेली नाराजी या निमित्ताने उघड झाली. आता जिल्हा परिषदेच्या राजकारणातून बर्वे थेट संसदेत पोहोचले. अनेक वर्षानंतर बर्वे यांच्या कुटुंबात खासदारकीची संधी चालून आली.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 Results| लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू : देवेंद्र फडणवीस
Lok sabha Election 2024 Results : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रिक
Lok sabha Election 2024 Results : : कोकणात महायुतीला पाच, तर मविआला एक जागा