Lok Sabha Election 2024 Results : चंद्रपुरात अडीच लाखाच्या मत्ताधिक्याने प्रतिभा धानोरकर विजयी
चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : १९ एप्रिलला पार पडलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (दि.४) पार पडली. २८ व्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुमारे २ लाख ५९ हजार मताधिक्याने आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळविला. मोठ्या मताधिक्याने राज्याचे वनमंत्री तथा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. अडीच लाखाच्या फरकाने आघाडी घेतल्याने धानोरकर यांनी विजयी जल्लोष साजरा केला.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिलला पहिल्या टप्यात पार पडली. त्यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यासह पंधरा उमेदवार रिंगणात उभे होते. भाजपाचे हेविवेट नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द कॉग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात अटीतटीचा सामना सुरू होता. मुनगंटीवार यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना लाखाच्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. परंतु आज हाती आलेले निकाल मुनगंटीवार यांच्यासाठी धक्कादायक ठरले. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून २८ व्या फेरीपर्यंत कॉग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनीच आघाडी घेतली. पहिल्या एक दोन फेरीनंतर मुनगंटीवार हे आघाडी घेतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु ती अपेक्षा भंग ठरली. २८ व्या फेरी अखेर प्रतिभा धानोरकर यांनी ७ लाख १६ हजार ६३५ मते मिळविली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार ४ लाख ५६ हजार ९४३ मते घेतली. तब्बल २ लाख ५९ हजार ६९२ मतांनी मुनगंटीवारांना मागे टाकले.
विधानसभेमध्ये प्रचंड मत्ताधिक्याने निवडून येण्याचा मान मुनगंटीवारांनी राज्यात मिळविला आहे. परंतु आजच्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. वंचितचे राजेश बेले यांना २१ हजार ८९७ मध्ये २८ व्या फेरी अखेर मिळाले. विशेष म्हणजे यावेळीही नोटाची संख्या वाढली . २०१९ मध्ये सुमारे ६ हजार नोटाला पसंती दिली होती. यावेळी त्यामध्ये वाढ होवून १० हजार ८२१ वर पोहचली आहे. २०१९ मध्ये मोदी सरकारमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर हे महाराष्ट्रात या जागेवर ४५ हजाराने एकमेव उमेदवार निवडून आले होते. परंतु काही महिण्यापूर्वीच त्यांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर त्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक लढवत मोठ्या मत्ताधिक्याने विजय मिळविला.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 Results| लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू : देवेंद्र फडणवीस
Lok Sabha Election 2024 Result महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचा दणदणीत विजय
Lok sabha Election 2024 Result : शेवटी चमत्कार घडलाच; अनिल देशमुख यांची लोकसभा निकालावर प्रतिक्रिया