तमिळनाडूला पावसाने झोडपले; अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमधील चेन्नईसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यातील शाळा-कॉलेज आज बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच चेन्नईशिवाय तिरुवल्लूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.३०) देखील वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. (Tamil Nadu … The post तमिळनाडूला पावसाने झोडपले; अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद appeared first on पुढारी.
#image_title

तमिळनाडूला पावसाने झोडपले; अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमधील चेन्नईसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यातील शाळा-कॉलेज आज बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच चेन्नईशिवाय तिरुवल्लूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.३०) देखील वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. (Tamil Nadu Rainfall)
Tamil Nadu Rainfall: २ आणि ३ डिसेंबर रोजी ऑरेंज अलर्ट
चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यातील शाळाही गुरुवारी बंद राहतील. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये २ आणि ३ डिसेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेन्नई, चेंगलपट्टू, विल्लुपुरम, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तिरुवरूर, तंजावर, पुदुकोट्टई, रामनाथपुरम आणि थुथुकुडी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान खात्याने येत्या काही दिवसांत, विशेषत: २ ते ४ डिसेंबर दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (Tamil Nadu Rainfall)
मदतीसाठी चेन्नई कॉर्पोरेशनकडून हेल्पलाइन
बुधवारी तामिळनाडूमधील चेन्नई आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने अनेक सखल भागांना झोडपले. सोशल मीडियावर दिसणार्‍या व्हिज्युअलमध्ये चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूरमधील अनेक रस्ते जवळपास गुडघाभर पाण्याने भरलेले दिसले. सततच्या पावसामुळे चेन्नईतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी चेन्नई कॉर्पोरेशनने शहरात हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. (Tamil Nadu Rainfall)
हेही वाचा:

Cyclone Michaung | बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळाची निर्मिती; ‘या’ राज्यात मुसळधारेची शक्यता
Weather Update : आणखी तीन दिवस राज्यातं अवकाळी पाऊस
Weather Update : अवकाळी पाऊसोबत दाट धुके अन् गारठा

The post तमिळनाडूला पावसाने झोडपले; अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमधील चेन्नईसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यातील शाळा-कॉलेज आज बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच चेन्नईशिवाय तिरुवल्लूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.३०) देखील वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. (Tamil Nadu …

The post तमिळनाडूला पावसाने झोडपले; अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद appeared first on पुढारी.

Go to Source