महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांचा दणदणीत विजय
यवतमाळ, Bharat Live News Media वृत्तसेवा : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचा एक लाखाच्या मतांनी पराभव केला आहे.
यवतमाळ जिल्हा हा लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागला गेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यानंतर मंगळवारी (दि.4) पार पडलेल्या एकूण ३० फेरीत मतमोजनी झाली. मतमोजनीत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांनी दणदणीत विजय प्राप्त मिळवला.
या निवडणुकीत पुसद, राळेगाव या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला तर यवतमाळ, दारव्हा, कारंजा आणि रिसोड या चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना आघाडी मिळाली आहे. पाचव्या फेरीपासूनच त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण जिल्ह्यात विजयाचा जल्लोष सुरू केला होता.
हेही वाचा :
Lok sabha Election 2024 Results : : कोकणात महायुतीला पाच, तर मविआला एक जागा
Lok sabha Election 2024 Results : कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रिक
Lok sabha Election 2024 Results : काँग्रेसच्या कल्याण काळेंनी ५ वेळचे खासदार, दानवेंचे ‘ऑपरेशन’ कसे केले?