छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठवाड्यात भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. मागील निवडणुकीमध्ये बीड, लातूर, नांदेड या तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, परंतु यावेळी मात्र मराठवाड्यातील मतदारांनी भाजपकडे तोंड फिरवले आहे.
सायंकाळपर्यंत मराठवाड्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, छत्रपती संभाजीनगर वगळता महायुतीला अन्य मतदारसंघात कुठेही यश मिळाले नाही. प्राप्त माहितीनुसार जालना, लातूर, नांदेड काँग्रेसकडे राहणार असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हिंगोली, परभणी, धाराशिव मतदारसंघात विजयी झाले आहेत. बीडमध्ये मतमोजणी सुरु झाल्यापासुन भाजप आणि महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत सुरु होती.
या झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बजरंग सोनवणे यांनी 6 लाख 81 हजार 569 इतके मताधिक्य मिळाले तर पंकजा मुंडेना 6 लाख 74 हजार 984 इतकी मते मिळाली. दरम्यान या लढतीत झालेल्या फेरमोजणीमध्ये सोनवणे यांचा 6585 मतांनी विजय झाला. बीड जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा हा वाद पेटल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला होता. त्यामुळे बीडची लढत अटीतटीची ठरली. पहिल्या काही फेर्यांमध्ये आघाडीवर असणार्या सोनवणे यांना नंतर मुंडे यांनी रोखून ठेवले. पण 32 व्या फेरीनंतर सोनवणे हे आघाडीवर राहिले आणि त्यांनी अटीतटीच्या लढतीत विजय खेचून आणला.
हेही वाचा :
धनंजय मुंडे यांनी गोळीबार केल्याची अफवा: ‘त्या’ समाजकटंकावर कारवाई करा – मुंडे
विधानसभेत पराभव.. लोकसभेत विजय.. कोण आहेत डॉ. हेमंत सवरा?
पाच वेळचे खासदार रावसाहेब दानवेंचा धक्कादायक पराभव का झाला?