धनंजय मुंडे यांनी गोळीबार केल्याची अफवा: ‘त्या’ समाजकटंकावर कारवाई करा- मुंडे

बीड; पुढारी वृत्तेसवा : मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा अल्प मतांनी पराभव केला. दरम्यान या मतमोजणी दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी मतमोजणी केंद्र नजीक गोळीबार केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. …
धनंजय मुंडे यांनी गोळीबार केल्याची अफवा: ‘त्या’ समाजकटंकावर कारवाई करा- मुंडे

बीड; Bharat Live News Media वृत्तेसवा : मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा अल्प मतांनी पराभव केला. दरम्यान या मतमोजणी दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी मतमोजणी केंद्र नजीक गोळीबार केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. राज्यभर या संदर्भात विचारणा होत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्ट करत असा कोणताही प्रकार त्यांच्या हातून घडला नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय अफवा पसरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे..
याप्रकरणाबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले,  बीड लोकसभा मतमोजणी दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात व माझ्या नावाचा वापर करून काही समाजकंटक सोशल माध्यमातून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. मुळात आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत मी बीड शहरात नव्हतो. आणि शासनाचा प्रतिनिधी असल्याने मी मतमोजणी केंद्राकडे गेलो नाही. त्यामुळे अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की, या सर्व अफवांची चौकशी करून अशा प्रकारे अफवा पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील जनतेला माझे नम्र आवाहन आहे की, जो निकाल येईल त्याचा सन्मान करून शांतता अबाधित राखावी असेही ते म्हणाले.

बीड लोकसभा मतमोजणी दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात व माझ्या नावाचा वापर करून काही समाजकंटक सोशल माध्यमातून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या अफवा पसरवीत आहेत. मुळात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी बीड शहरात नव्हतो आणि शासनाचा प्रतिनिधी असल्याने मी मतमोजणी केंद्राकडे गेलो… https://t.co/Qdbw0ffk0U
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 4, 2024