तिस-यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणारच : नरेंद्र मोदी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election Results : तिस-यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. देशवासीयांनी भाजप, एनडीवर पूर्ण विश्वास दाखवला. मी त्यासाठी देशाच्या जनतेचा खूप आभारी आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा विजय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभा निवडणूक निकालानंतर आयोजित भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
पीएम मोदी पुढे म्हणाले, देशात सबका साथ सबका विकास याचा विजय झाला आहे. एनडीएला तिस-यांदा मिळालेल्या जनादेश खूप महत्त्वाचा आहे. 1962 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे. त्याचबरोबर ओडिशा राज्यातही भाजप सरकार बनवत आहे. केरळमध्येही भाजपने लोकसभेची जागा जिंकून इतिहास रचला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विक्रमी मदतान झाले. तेलंगणामध्ये आपची संख्या दुप्पट झाली आहे. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात या राज्यात भाजपने जवळपास क्लिन स्विप केला आहे. हे यश सर्व कार्यकर्त्यांचे आहे.’
‘10 वर्षांपूर्वी मागे वळून पाहिले तर तेव्हा देश निराशेच्या गर्तेत सापडला होता. सर्व व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेली होती. त्यानंतर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून 2014 मध्ये एनडीएला पहिल्यांदा बहुमताने सत्ता दिली. पुढच्या पाच वर्षात आम्ही जोमाने काम केले. ते पाहुन जनतेने पुढे 2019 आणि आता 2024 मध्येही सलग तिस-यांना सत्ता बहाल केली आहे. जनतेच्या या आपच्या वरील विश्वासाला कधीच तडा देणार नाही,’ असेही पीएम मोदी म्हणाले.


Home महत्वाची बातमी तिस-यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणारच : नरेंद्र मोदी
तिस-यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणारच : नरेंद्र मोदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election Results : तिस-यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. देशवासीयांनी भाजप, एनडीवर पूर्ण विश्वास दाखवला. मी त्यासाठी देशाच्या जनतेचा खूप आभारी आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा विजय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभा निवडणूक निकालानंतर आयोजित भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात …