गडचिरोली : काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान १ लाख ४० हजार मतांनी विजयी
गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज पार पडली. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झाले आहेत.
शेवटच्या २६ व्या फेरीअखेर नामदेव किरसान यांना ६ लाख १४ हजार ६१०, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना ४ लाख ७४ हजार ३७६ मते मिळाली. बसपाचे प्रा. योगेश गोन्नाडे हे १८ हजार ९३० मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘नोटा’ ला १६ हजार ५०७ मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हे १५ हजार ८२४ मते घेऊन पाचव्या क्रमांकावर राहिले. सध्या टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरु असून, ती आटोपताच विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. विजयाची खात्री पटल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढण्यात आली.
हेही वाचा :
भंडारा-गोंदिया मतदारसंघावर २५ वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा
धुळे लोकसभा मतदार संघात शोभाताई बच्छाव 5155 मतांनी आघाडीवर