थ्रीडी प्रिंटरने बनवला मानवी पंज्यासारखाच रोबोटिक हँड
झुरिच : स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी जवळजवळ पूर्णपणे मानवी पंज्यासारखेच काम करणारा रोबोटिक हँड तयार केला आहे. या रोबोटिक हाताची निर्मिती थ्रीडी प्रिंटेड हाडे, अस्थिबंधन आणि स्नायूबंध यांच्यापासून करण्यात आली. प्लास्टिकच्या चार स्तरांपासून बनवलेल्या कठीण आणि मऊ भागांच्या मिश्रणातून हा रोबोटिक हात बनला. भविष्यातील प्रगत रोबोंमध्ये अशा हातांचा वापर केला जाईल.
याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ईटीएच झुरिचमधील रोबोटिक्स विषयाचे प्राध्यापक रॉबर्ट कात्झश्मन यांनी याबाबतची माहिती दिली. हे हात मऊ असल्याने माणसाबरोबर काम करीत असताना दुखापत होण्याचा धोका कमी होतो. नाजूक वस्तू हाताळण्यासाठी अशा हातांचा चांगला उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. अनेक कारखान्यांमध्ये सध्या रोबोंचा वापर केला जात असतो. कधी कधी रोबोंमुळे मानवाचा जीवही धोक्यात येतो.
तशा काही घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. त्यामुळे कारखान्यांमध्ये वापरण्यात येणारे रोबो अधिक नाजूकपणे गोष्टी हाताळू शकतील, अशा पद्धतीने बनवणे गरजेचे बनले होते. त्यादृष्टीने हे संशोधन करण्यात आले आहे. त्यासाठी ‘फास्ट-क्युरिंग’ पॉलीअॅक्रीलेट्सऐवजी ‘स्लो-क्युरिंग’ थायोलिन पॉलीमर्सचा वापर करण्यात आला. त्यांच्यामध्ये अतिशय चांगले इलॅस्टिक गुणधर्म असतात. आपल्या मूळ स्थितीत ते वेगाने येऊ शकतात.
The post थ्रीडी प्रिंटरने बनवला मानवी पंज्यासारखाच रोबोटिक हँड appeared first on पुढारी.
झुरिच : स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी जवळजवळ पूर्णपणे मानवी पंज्यासारखेच काम करणारा रोबोटिक हँड तयार केला आहे. या रोबोटिक हाताची निर्मिती थ्रीडी प्रिंटेड हाडे, अस्थिबंधन आणि स्नायूबंध यांच्यापासून करण्यात आली. प्लास्टिकच्या चार स्तरांपासून बनवलेल्या कठीण आणि मऊ भागांच्या मिश्रणातून हा रोबोटिक हात बनला. भविष्यातील प्रगत रोबोंमध्ये अशा हातांचा वापर केला जाईल. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात …
The post थ्रीडी प्रिंटरने बनवला मानवी पंज्यासारखाच रोबोटिक हँड appeared first on पुढारी.