दाम्पत्य इतके भांडले की विमानच करावे लागले लँडिंग!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एका दाम्पत्यामध्ये इतके जोरात भांडण झाले की, त्यामुळे बँकॉकहून म्युनिकला जाणार्‍या लुफ्थान्साच्या एलएच 772 विमानाचे दिल्लीत तत्काळ लँडिंग करण्यात आले. या प्रकारामुळे विमान दिल्लीकडे वळवल्याची माहिती विमानतळाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी दिली. या अगोदर पाकिस्तानमध्ये लँडिंगची परवानगी मागितली; पण ती नाकारण्यात आली. विमानात सुरुवातीला पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि हळूहळू मारामारीत रूपांतर झाले. यानंतर … The post दाम्पत्य इतके भांडले की विमानच करावे लागले लँडिंग! appeared first on पुढारी.
#image_title

दाम्पत्य इतके भांडले की विमानच करावे लागले लँडिंग!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एका दाम्पत्यामध्ये इतके जोरात भांडण झाले की, त्यामुळे बँकॉकहून म्युनिकला जाणार्‍या लुफ्थान्साच्या एलएच 772 विमानाचे दिल्लीत तत्काळ लँडिंग करण्यात आले. या प्रकारामुळे विमान दिल्लीकडे वळवल्याची माहिती विमानतळाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी दिली. या अगोदर पाकिस्तानमध्ये लँडिंगची परवानगी मागितली; पण ती नाकारण्यात आली.
विमानात सुरुवातीला पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि हळूहळू मारामारीत रूपांतर झाले. यानंतर विमानातील क्रू मेंबर्सनी विमान वळवण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. एका जर्मन पुरुषाचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले. पत्नी थायलंडची आहे. पती वाईट वागणूक आणि भांडण करत मला धमकावले असल्याची तक्रार महिलेने पायलटकडे केली होती. भांडण इतके विकोपाला गेले की भांडखोर व्यक्तीला दिल्ली विमानतळावर उतरवून सुरक्षा अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले. पत्नीशी भांडण करणार्‍या व्यक्तीने मद्यप्राशन केले होते, असे सांगण्यात येत आहे.

The post दाम्पत्य इतके भांडले की विमानच करावे लागले लँडिंग! appeared first on पुढारी.

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एका दाम्पत्यामध्ये इतके जोरात भांडण झाले की, त्यामुळे बँकॉकहून म्युनिकला जाणार्‍या लुफ्थान्साच्या एलएच 772 विमानाचे दिल्लीत तत्काळ लँडिंग करण्यात आले. या प्रकारामुळे विमान दिल्लीकडे वळवल्याची माहिती विमानतळाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी दिली. या अगोदर पाकिस्तानमध्ये लँडिंगची परवानगी मागितली; पण ती नाकारण्यात आली. विमानात सुरुवातीला पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि हळूहळू मारामारीत रूपांतर झाले. यानंतर …

The post दाम्पत्य इतके भांडले की विमानच करावे लागले लँडिंग! appeared first on पुढारी.

Go to Source