राजस्थानमध्ये भाजप ६ जागांवर विजयी, काँग्रेसची मुसंडी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मतमोजणी सुरु आहे. दुपारी दाेन वाजता भाजपने आघाडीवर असलेल्या सहा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने तीन जागा काबीज केल्या आहेत.
राजस्थानात भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानात मतमोजणी सुरू असून, अतितटीची लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे तिन्ही आघाडीचे उमेदवारही मोठ्या फरकाने विजयी होताना दिसत आहेत. निकालात हा आकडा बदलला तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाईल.